Income Tax Refund वर का मिळाले नाही व्याज?, जाणून घेण्याची ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income tax Refund आला किंवा नाही, हे जाणून घेणे खुप सोपे आहे. आणखी प्रश्न असतो की, जर रिफंड आला आहे तर त्यावर व्याज मिळेल का. बहुतांश Taxpayer ला वाटते की Refund सोबत व्याज सुद्धा मिळते. मात्र, असे नाही. कारण Income tax च्या नियमानुसार प्रत्येक Refund वर व्याज मिळत नाही. Refund चेक करण्याचा फॉर्म्युला जाणून घेवूयात.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

किती आला Refund

Income Tax विभागाने 1 एप्रिल 2021 पासून 24 मे 2021 पर्यंत 25301 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड दिला आहे. हा रिफंड 15.45 लाख टॅक्स पेयर्सला देण्यात आला. यामध्ये 15 लाख 397 लोकांना एकुण 7494 कोटी रुपये दिले गेले. तर 44140 केसमध्ये 17807 कोटी रुपये Refund करण्यात आले आहेत.

 

कसा चेक कराल आपला Refund

NSDL च्या वेबसाइटवर जा. तिथे PAN आणि असेसमेंट ईयर भरा.

  यानंतर तुम्हाला ITR च्या बाबत समजेल.

किंवा इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जा.

ई-फायलिंगसाठी Login करा. यानंतर व्ह्यू रिटर्न्स/फॉर्म्स सिलेक्ट करा.

My Account वर इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करा.

यानंतर एकनॉलेजमेंट नंबरवर क्लिक करा.
आता स्क्रीनवर पेज उघडेल,
ज्यामध्ये पूर्ण माहिती मिळेल.

 

Tax Liability कमी

कर चुकता केल्यानंतर जर Tax Liability कमी असेल तर तुम्ही Income Tax refund साठी eligible आहात. म्हणजे TDS, TCS किंवा दुसर्‍या प्रकारचा Tax जास्त कापला गेला परंतु प्रत्यक्षात टॅक्स कमी झाला असेल तर विभाग Refund देईल. हा IT Refund टॅक्सपेयर रिटर्न भरून घेऊ शकतात. Income Tax department ITR प्रोसेस केल्यानंतर इन्कम टॅक्स रिफंड देईल.

 

Tax Refund वर व्याज

Tax Expert आणि CA अरविंद दुबे यांच्यानुसार Tax Refund वर व्याज तेव्हाच मिळेल जेव्हा दिलेल्या रक्कमेएवढा टॅक्स झाला आहे, त्याच्या 10 टक्केपेक्षा जास्त आहे. ITR दाखल केल्यानंतर रिफंड वेळेवर येत नाही.

याचे कारण रिटर्न फाईल करताना संपूर्ण माहिती न देणे असू शकते. रिटर्न दाखल करताना बँक खात्यांची योग्य संख्या, बँकेचा योग्य IFSC कोड भरणे आवश्यक असते. जर बँकेचा IFSC कोड भरताना गडबड झाली असेल तर रिफंड मिळणार नाही.

Web Title : income tax refund check the status of your money and see why delay received income tax refund without interest you might be missing this eligibility

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

7th Pay Commission | पेन्शनर्सला सरकारने दिला मोठा दिलासा ! आता घरबसल्या मिळेल पेन्शन स्लिप, होतील ‘हे’ फायदे