Income Tax Return | 30 जूनपर्यंत करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दुप्पट TDS, जाणून घ्या नवीन नियमाबाबत सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जर तुम्ही अजूनपर्यंत तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) फाईल केलेला नसेल तर तुम्हाला दुप्पट टीडीएस (Double TDS) भरावा लागेल. यासाठी, 30 जून 2021 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपला आयटीआर दाखल करा. जर एखाद्या टॅक्सपेयरने मागील 2 वर्षाच्या दरम्यान टीडीएस दाखल केलेला नसेल आणि दरवर्षी टीडीएसची कपात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर प्राप्तीकर विभाग (Income Tax Department) 1 जुलै 2021 पासून आयटीआर दाखल करताना जास्त शुल्क (Higher Charges) वसूल करेल. Income Tax Return | if you did not file itr till now then file it by 30 june 2021 otherwise doubled tds would deduct

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

आयटीआर (ITR) दाखल न करणार्‍यांसाठी नवीन नियम

नवीन अर्थ कायदा 2021 लागू झाल्यानंतर टीडीएसच्या नियमात (TDS rules) बदल 1 जुलै 2021 पासून लागू होतील. या अंतर्गत मागील 2 वर्षांसाठी आयटीआर दाखल केलेला नसल्यास
आणि प्रत्येक वर्षी कापला गेलेला टीडीएस 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास दुप्पट टीडीएस (TDS) द्यावा लागेल.
म्हणजेच मागील आर्थिक वर्षात टीडीएस 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तरी सुद्धा टीडीएस कपात 5 टक्केच्या दराने होईल.

नवीन पोर्टलमध्ये दिल्या या सुविधा

प्राप्तीकर रिटर्न ई-फायलिंग पोर्टलमध्ये (Return e-filing portal) एक नवीन सुविधा आहे,
ज्याद्वारे हे जाणून घेता येऊ शकते की, व्यक्तीने अगोदर रिटर्न दाखल केला आहे किंवा नाही.
नवीन कलम -206AB च्या अंतर्गत, ज्या लोकांना मागील दोन वर्षापासून
आयटीआर दाखल केलेला नाही, त्यांना दुप्पट टीडीएस द्यावा लागेल.

Web Title : Income Tax Return | if you did not file itr till now then file it by 30 june 2021 otherwise doubled tds would deduct

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IndiGo Monsoon Sale Offer | इंडिगोने आणली Monsoon Sale Offer; मात्र 998 रुपयात करा विमान प्रवास