Indapur Pune News | देशात उंच घोड्यामध्ये नावलौकिक असलेल्या ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Indapur Pune News | घोड्यांवरून प्रवास करण्याची फार पूर्वीपासून असलेली परंपरा काळानुरूप नामशेष होत गेली. पण अद्यापही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून घोड्यावरून सवारी केली जाते. पण याच घोड्यांना इतिहास काळात महत्त्वपूर्ण स्थान होते. आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो. लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे. इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी निलेश अष्टेकर यांनी जिवापार सिंकदर या घोड्याचे सांभाळ केला होता. मात्र आज सकाळी सिंकदरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.(Indapur Pune News)

देशातीत उंच घोड्यामध्ये सिंकदरचा नावलौकिक होता . तो ९ वर्षांचा होता. हा घोडा अष्टेकर फार्म येथे राहात होता. अनेक रेकॉर्डमध्ये त्याचे नाव नोंदवले होते. सोशल मीडियावर या घोड्याच्या निधनाची माहिती आल्यानंतर परिसरातील नागरिकांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अष्टेकर यांच्या मते हा एक सुपरस्टार आणि शानदार घोडा होता. त्याचा पंजाबमध्ये जन्म झाला होता.
ही आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दु:खद घटना असल्याचे घोड्याचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाकडून कळवण्यात आले.
सकाळी दहा वाजता अंतविधी करण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar – RSS – BJP | संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”

Chhagan Bhujbal | लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 जागांवर परिणाम कसा? भुजबळांचा सवाल

Bhide Wada Smarak | भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारक; भूमिपूजन जुलै मध्ये होणार असल्याची अजित पवारांची माहिती