India Aghadi – Lok Sabha Speaker | लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधक उमेदवार देणार?; विरोधक मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत

दिल्ली: India Aghadi – Lok Sabha Speaker | केंद्रात एनडीएने सरकार (NDA Govt) स्थापन केले आहे. नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यासोबतच ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. टीडीपी (TDP) आणि जेडीयू (JDU) या पक्षांची भूमिका महत्वाची राहिली. दरम्यान आता लोकसभा अध्यक्षपद कोणाकडे जाणार यावर चर्चा सुरु आहेत.(India Aghadi – Lok Sabha Speaker)

टीडीपी ने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे तर भाजपाला अध्यक्षपद आपणाकडे ठेवायचे आहे. दरम्यान आता विरोधी पक्षही लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार देऊ शकतात अशी चर्चा आहे.

अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून पासून सुरू होत आहे. २६ जून रोजी लोकसभा आपल्या नवीन सभापतीची निवड करेल. त्यामुळे विरोधी पक्षही सभापतींच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करू शकतात, असे बोलले जात आहे.

विरोधी पक्षांना उपाध्यक्षपद न दिल्यास ते अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देऊ शकतात.
यासंदर्भातील अंतिम निर्णय संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी घेण्यात येऊ शकतो.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जून रोजी सुरू
होईल आणि ३ जुलै रोजी संपेल.

९ दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाईल आणि नवीन खासदार शपथ घेतील.
दरम्यान, राज्यसभेचे अधिवेशन २७ जून ते ३ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी
दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | औंध: दरोड्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, येऊन पाहतात तर घर भुईसपाट; 5 जणांवर FIR