India Book of Records | 5 वर्षाच्या चिमूरडीने 5 मिनिटांत म्हंटले संस्कृतचे 30 श्लोक; इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  संस्कृतमधील श्लोक (sanskrit shlok) लक्षात ठेवताना आणि म्हणताना भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, पुण्यातील (Pune) एका पाच वर्षाच्या चिमुरडीने अवघ्या पाच मिनिटात संस्कृतचे 30 श्लोक (30 verses in five minutes) म्हटले आहेत. माहिका पोतनीस (Mahika Potnis) असे या चिमुरडीचे नाव असून तिच्या या कामगिरीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने (India book of records) दखल घेतली आहे. यापूर्वी ईशान्वी आढळराव-पाटील (Ishanvi Adhalrao-Patil) या चिमुकलीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने (India book of records) दखल घेतली होती. ईशान्वीने 3 मिनिटे 10 सेकंदात 195 देशाचे ध्वज (Flag) पाहून देशांचं नाव आणि राजधानी (Capital) सांगितली होती.

यासंदर्भात बोलताना माहिकाची आई सारिका पोतनीस (Sarika Potnis) म्हणाल्या की, रोज सकाळी माहिका भगवद्गीतेचे (Bhagavad Gita) श्लोक वाचण्याचा प्रयत्न करायची.
त्यामुळे आम्हाला तिची आवड समजली. त्यानंतर आम्ही तिला संस्कृत श्लोक पठण करण्यासाठी त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तिला प्रोत्साहीत केले.

दरम्यान, श्लोक पठण करतानाचा माहिकाचा व्हिडीओ काढून तो इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ला पाठवला होता. त्यांनी तिची दखल घेतली आहे.
इतक्या लहान वयातही ती संस्कृतमधील श्लोकांचे व्यवस्थित उच्चार करते, असेही त्यांनी सांगितले.
माहिकाचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेल्याने तिचे सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात आहे.

Web Title : India Book of Records | 5 year old girl narrated 30 verses in five minutes name entered in india book of records

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Bangalore National Highway | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद, अनेक वाहने अडकली (Video)

Crime in Nagpur | पोलिसांच्या दाव्याची संशयिताने केली पोलखोल; म्हणाला – ‘चार महिन्यापासून बंद आहेत सीसीटीव्ही’

Pimpri-Chinchwad Police | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक, आरोपींकडून पिस्टल जप्त