Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

पुणे : Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत न्युट्रीलिशियस् आणि हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Indrani Balan Winter T-20 League)

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सचिन राठोड याच्या ९५ धावांच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने एसके डॉमिनेटर्स संघाचा ४ गडी राखून स्पर्धेत चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एसके डॉमिनेटर्स संघाने १६२ धावांचे आव्हान उभे केले. साहील औताडे याने ४७ धावांची खेळी करून यामध्ये मुख्य वाटा उचलला. या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन राठोड याने ६५ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह ९५ धावांची एकहाती खेळी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १८.५ षटकात लक्ष्य गाठून सामन्यात विजय मिळवला. (Indrani Balan Winter T-20 League)

अर्थव काळे याच्या नाबाद शतकी खेळीमुळे न्युट्रीलिशियस् संघाने पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ६९ धावांनी पराभव करत स्पर्धेत पाचवा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्युट्रीलिशियस् संघाने २०४ धावांचा डोंगर उभा केला. अर्थव काळे याने ६१ चेंडूत ९ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०४ धावांची खेळी केली. हृषीकेश राऊत (नाबाद ३३ धावा) आणि आदित्य लोंढे (२३ धावा) व श्रेयस वालेकर (२० धावा) यांनी अर्थव याला उत्तम साथ दिली. आदित्य आणि अर्थव यांनी दुसर्‍या गड्यासाठी ४५ चेंडूत ७४ धावांची भागिदारी केली. याला उत्तर देताना पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १४५ धावांवर आटोपला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एसके डॉमिनेटर्सः २० षटकात ६ गडी बाद १६२ धावा (साहील औताडे ४७, यश माने २५, शुभम खटाळे २३,
सागर होगडे ३-१२, संदीप शिंदे २-२६) पराभूत वि. हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १८.५ षटकात ६ गडी बाद १६४
धावा (सचिन राठोड ९५ (६५, ११ चौकार, ५ षटकार), संदीप शिंदे २६, हितेन बनसोडे २-२१); सामनावीरः
सचिन राठोड;

न्युट्रीलिशियस्ः २० षटकात ३ गडी बाद २०४ धावा (अर्थव काळे नाबाद १०४ (६१, ९ चौकार, ७ षटकार),
हृषीकेश राऊत नाबाद ३३, आदित्य लोंढे २३, श्रेयस वालेकर २०);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी आदित्य आणि
अर्थव यांच्यात ७४ (४५) वि.वि. पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १८.१ षटकात १० गडी बाद १४५ धावा
(शिवम पटेल ४३, प्रतिक बोधगिरे ३८, प्रविण सिंग ३-११, ओम पवार ३-३४); सामनावीरः अर्थव काळे;

 

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Winning performance of Nutrilicious, Hemant Patil Cricket Academy teams