Jairaj Group Pune | जयराज ग्रुपचे संस्थापक स्व. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या 7 व्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jairaj Group Pune | जयराज ग्रुपचे संस्थापक स्व. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवारी दिनांक २१ जुलै २०२३ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत हमाल कामगार व त्यांच्या कुटुंबियांची मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर (Free Eye Examination) हमाल भवन, मार्केटयार्ड, पुणे येथे आयोजित केले होते. (Jairaj Group Pune)

सदर शिबीराचे उदघाटन हमाल कामगार नेते डॉ. बाबा आढाव ह्यांचा हस्ते झाले. तर या शिबीरास प्रमुख पाहुणे म्हणून पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया उपस्थित होते.

सदर शिबीराला पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबोले, दिपक बोरा, सहसचिव रायकुमार नहार, सदस्य नितीन नहार, आडते असोसिएशन चे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, पूना गुजराती बंधू समाजाचे जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज चे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सचिव अस्मिता पाटील, हमाल पंचायतचे सचिव गोरख मेंगडे, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुशीला कवडे व १० डॉक्टर सहकारी उपस्थित होते. (Jairaj Group Pune)

राजेश शहा व धवल शहा यांनी सर्व पाहुण्यांचा सत्कार केला.

प्रमुख पाहुणे डॉ. बाबा आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नेहमी सत्त्याची कास धरावी व गोर गरिबांची सेवा करावी जशी महात्मा गांधींजीच्या विचाराप्रमाणे जयराज ग्रुपचे संस्थापक स्व. हिराभाई शहा यांनी व्यापार व दीन दुबळ्यांची सेवा केली असे उद्गार काढले. तसेच त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दार वर्षी समाजसेवेचे उपक्रम त्यांचे चिरंजीव राजेश शहा हे राबवत असतात.

राजेंद्र बाठिया यांनी बोलताना हिराभाई शहा हे आमच्या गुरु स्थानी असून त्यांचा सहवास आम्हांला लाभला हे आम्ही
आमचे सौभाग्य समजतो असे असे नमूद केले.

राजेश शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला शाळेतील प्रसंग सांगितला,
जेव्हा म. गांधीजीनी चले जावो आंदोलन सुरु केले तेव्हा वडिलांनी त्यात सहभाग घेतला होता.
वडिलांच्या पुण्यतिथी निमित्तानी समाजातील गरजू लोकांची सेवा करण्याची संधी अविरत पुढेही चालू राहील.

नेत्र तपासणीची सुरुवात हि डॉ. बाबा आढाव यांच्या डोळे तपासणी ने झाली.

हमाल कामगारांनी उत्फुस्तपणे प्रतिसाद दिला, शिबीराला महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
सदर शिबीरामध्ये ५५० जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली, २५० जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले
तर ३५ जणांना मोतीबिंदू आढळला असून त्या सर्वांची एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

स्वागत करताना विवेक कुलकर्णी यांनी हिराभाईचां दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा वसा आता त्यांचे सुपुत्र श्री. राजेश शहा चालवत आहेत हे आवर्जून सांगितले.
धवल शहा यांनी सर्वांचें आभार मानले. शिबीराला जयराज ग्रुपचा स्टाफ उपस्थित होता.

Pune Traffic Police | वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना न्यायालयाचा दणका ! तडजोड खटल्यासाठी उपस्थित न राहणाऱ्यांविरुद्ध ‘पकड वॉरंट’