JDS-BJP Alliance | लोकसभा निवडणूकीसाठी जनता दल (सेक्युलर) आणि भाजपाची युती जाहीर; कर्नाटकामध्ये विरोधकांना तगड आव्हान

पोलीसनामा ऑनलाइन – JDS-BJP Alliance | आगामी लोकसभा 2024च्या निवडणूकीचे (Loksabha Election 2024) रणशिंग फुंकले गेले असून सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हरवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांनी ‘इंडिया आघाडी’ (I.N.D.I.A.) स्थापित केली असून एनडीए कडून (NDA) देखील निवडणूकपूर्वीची योजना आखणीस सुरुवात झाली आहे. यामध्ये जनता दल (सेक्युलर) (Janata Dal Secular (JDS) अर्थात जेडीएसचे सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनी भाजपाची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये जेडीएस आणि भाजपा (JDS-BJP Alliance) हे एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मागील काही दिवसांपासून कर्नाटक राज्यातील महत्त्वाचे राजकारणी असणारे एचडी देवेगौडा हे ‘इंडिया’ आघाडी सोबत युती करणार की ‘एनडीए’ आघाडीचा हात हातात घेणार याबद्दल चर्चा सुरु होती. अनेक दिवसांपासून तळ्यात मळ्यात अशी स्थिती असणाऱ्या जेडीएसने भाजपासोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

माजी पंतप्रधान असलेल्या एचडी देवेगौडा यांनी भाजपासोबतची युती जाहीर केली असून भाजपाचे नेते बीएस येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनीही वृत्ताला दुजोरा दिला आहे. बंगळुरुमध्ये रविवारी (दि.10) जेडीएसचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी एचडी देवेगौडा यांनी लोकसभा निवडणूकीची भाजपासोबतची युती जाहीर केली. तसेच ‘इंडिया’ आगाडीवर जहरी टीका करत नाराजी देखील व्यक्त केली. एचडी देवेगौडा कार्यक्रमावेळी म्हणाले की, “दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र निवडणुका लढवण्याचे ठरवले आहे. एचडी कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपापसात चर्चा करुन कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे सूत्र ठरवतील.” असे देखील एचडी देवेगौडा यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे त्यांनी भाजपासोबत युती करण्यामागचे महत्त्वाचे कारण देखील सांगितले.
आपल्या प्रादेशिक पक्षाचे अस्तिव टिकवण्यासाठी ही युती केली असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सोबतच त्यांनी विरोधकांनी केलेल्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका करत नाराजी देखील व्यक्त केली.
एचडी देवेगौडा म्हणाले की, “आपण इतके मोठे धर्मनिरपेक्ष नेते असूनही काँग्रेस आणि ‘इंडिया’च्या इतर नेत्यांनी
या आघाडीचा भाग होण्यासाठी त्यांच्याशी साधा संपर्कही साधला नाही.”
अशा शब्दांत त्यांचा इंडिया आघाडीबाबतीत नाराजीचा सूर दिसून आला.

देशामध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी व विरोधक यांची तयारी सुरु झाली आहे.
इंडिया आघाडीच्या देखील बैठका पार पडत असून अद्याप त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा समोर आलेला नाही.
भाजपाकडून देखील निवडणूकपूर्व तयारी सुरु झाली असून कर्नाटकामध्ये जेडीएसच्या सहाय्याने विरोधकांपुढे
(JDS-BJP Alliance) तगडे आव्हान निर्माण केले जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चंदननगर: कपड्यांऐवजी पाठविल्या चिंध्या; व्यापारी महिलेची 3 लाखांची फसवणूक