Joseph Manu James | मल्याळम सिने-निर्माते जोसेफ मनु जेम्स यांचे निधन; वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन : मल्याळम सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मल्याळम सिने निर्माते जोसेफ मनू जेम्स (Joseph Manu James) यांचे वयाच्या 31 व्या वर्षी निधन झाले. त्यांना न्युमोनिया झाल्यामुळे केरळमधील अलुवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. जोसेफ (Joseph Manu James) यांच्या निधनानंतर मल्याळमसिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

जोसेफ यांचा पहिला सिनेमा ‘नॅन्सी राणी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटात अहान कृष्णा आणि अर्जुन अशोकन हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सध्या या सिनेमाचे पोस्ट प्रोडक्शन काम सुरू असून लवकर सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अहान कृष्णा आणि अर्जुन अशोकांसह अजु वर्गीज, श्रीनिवासन, इंद्रांस, सनी वेन, लेने आणि लाल यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत.

जोसेफ यांच्या निधनानंतर अहान आणि अर्जुनने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. अहान जोसेफ यांचा फोटो शेअर करत म्हणाले , “मनू यांच्या आत्म्याला शांती मिळो, तुम्ही जगाचा निरोप घ्यायला नको होता”. असे लिहिले आहे. तर अर्जुनने जोसेफचा फोटो शेअर करत “भावा खूपच लवकर गेलास असे म्हटले आहे”. सध्या या दोघांच्या पोस्टवर मल्याळमसृष्टीतील कलाकारांसह चाहते देखील जोसेफला श्रद्धांजली वाहत आहेत.

कोण आहेत जोसेफ मनू जेम्स?
2004 साली जोसेफने (Joseph Manu James) सिनेसृष्टीत पदार्पण केले होते.
साबू जेम्सच्या ‘आय अ‍ॅम क्यूरियस’ या सिनेमात त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली होती.
त्यानंतर त्यांनी अनेक मल्याळम आणि कन्नड सिनेमात चित्रपटात देखील झळकले.
एवढेच नाही तर त्यांनी बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे.
त्यांनी त्यांच्या कामाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. जोसेफ यांच्या पश्चात त्यांची पत्नी मनु नैना आहे.

Web Title :- Joseph Manu James | malayalam director joseph manu james passes away at 31 ahead of the release of his debut film

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Crime News | पोलादपूरमध्ये 55 वर्षीय व्यक्तीची नैराश्याच्या भरात आत्महत्या

Pune Crime News | एक्स्ट्रा चार्जेस कमी करुन घेणे पडले महागात; टीम व्हिव्हर अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगून केली फसवणूक

Ranbir Kapoor | रणबीर कपूर सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये नाही तर ‘या’ दिग्गज गायकाच्या बायोपिक मध्ये झळकणार; अभिनेत्याने केला खुलासा