Kalamba Central Jail | कळंबा कारागृहातील मोबाइल प्रकरण आलं अंगलट, दोन अधिकाऱ्यांसह 9 कर्मचारी बडतर्फ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kalamba Central Jail | कळंबा मध्यवर्ती कारागृहात सापडलेल्या 80 हून अधिक मोबाइल प्रकरणात कारागृहातीलच काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती (Jail Officer-Police Suspended). या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. चौकशीमध्ये कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाने दोन तुरुंग अधिकारी व नऊ कर्मचाऱ्यांना सेवेतून तडकाफडकी बडतर्फ केले आहे.(Kalamba Central Jail)

कळंबा मध्यवर्ती कारागृहात मागील काही काळापासून कैद्यांकडे सतत मोबाईल आणि सिमकार्ड सापडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची येरवडा (Yerawada Jail) आणि उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात (Solapur Jail) बदली करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी कारागृह प्रशासनाने वरिष्ठ अधिकारी आणि पाच कर्मचारी अशा 15 जणांचे विशेष पथक कोल्हापूर कारागृहात (Kolhapur Jail) नियुक्त केले.

नियुक्त केलेल्या तपास पथकाने 30 मार्चपासून दररोज कारागृहातील कैद्यांची झडती घेऊन 25 दिवसांत 80 हून अधिक मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केले आहेत.
सापडलेले मोबाइल खुली जागा, भिंतीत, स्वच्छतागृहात आणि काही बरॅकच्या कोपऱ्याजवळ सापडले आहेत.
जमिनीत सुमारे एक फूट खोल जागेत लपवून ठेवल्याचेही उघड झाले आहे.
याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सापडलेल्या मोबाइलचा कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासणीचे काम चौकशी पथकाने केले आहे.
त्यांचा अहवाल आल्यानंतर कारागृह प्रशासनाने दोन अधिकारी आणि 9 कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

मध्यवर्ती कारागृहात एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सिमकार्ड सापडत असल्याच्या घटनांची कारागृह प्रशासनाने
गंभीर दखल घेतली. या प्रकरणी कारगृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचे चौकशीत
आढळून आले. त्यामुळे कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दोन वरिष्ठ तरुंग अधिकाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश
काढले असून, कारागृह उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) स्वाती साठे यांनी नऊ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Praniti Shinde On BJP | सत्ता असताना तीन वेळा उमेदवार का बदलला, प्रणिती शिंदे यांचा भाजपला सवाल

Ajit Pawar On Shriniwas Pawar | सख्खा भाऊ विरोधात का गेला, अजित पवारांनीच सांगून टाकलं श्रीनिवास पवार काय म्हणाले होते, तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो