Kantara Box Office Collection | ‘कांतारा’ चित्रपटाने बाहुबली -2 नंतर मोडला ‘या’ जादुई चित्रपटाचा रेकॉर्ड

पोलीसनामा ऑनलाईन : Kantara Box Office Collection | ‘कांतारा’ (Kantara) हा चित्रपट सध्या रोजच नवनवीन विक्रम गाजवत आहे. सध्याचे वर्ष कन्नड चित्रपट सृष्टीला आनंददायी वर्ष ठरत आहे. केजीएफ 2 (KGF 2) या चित्रपटाने संपूर्ण देशात विक्रम तोड कमाई (Kantara Box Office Collection) केल्यानंतर आता कांतारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आज पर्यंत ओपनिंग पेक्षाही अधिक कमाई चालू आहे.

14 ऑक्टोबर रोजी कांतारा चा हिंदी वर्जन प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट आता सहाव्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसात 17.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने 2019 मध्ये प्रदर्शित झालेला विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ (Uri The Surgical Strike) या चित्रपटाचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाने सहाव्या आठवड्यात 11.60 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. याला बॉक्स ऑफिस तज्ञांनी जादू असे म्हटले होते. आता कांतारा या चित्रपटाने उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडला आहे. फक्त उरीच नव्हे तर कांतारा या चित्रपटाने बाहुबली टू च्या कमाईलाही मागे टाकले आहे.

आता कांतारा हा चित्रपट 2022 या वर्षातील टॉप फाईल चित्रपटांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. सहाव्या आठवड्यात कांतारा या चित्रपटाने ऑल टाईम रेकॉर्ड मोडला आहे.
टॉप 5 चित्रपटात केजीएफ 2 ने 859.55 कोटी रुपये कमावले.
तर RRR ने 772.10 कोटी रुपयांची कमाई केली होती.
आता कांतारा हा चित्रपट आज पर्यंत 267.55 कोटी रुपये कमावले असून या चित्रपटाची कमाई अद्याप सुरु आहे.

Web Title :-  Kantara Box Office Collection | kantara box office collection breaks all time magical 6th week record by uri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

You Must Die | ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतवून टाकण्यासाठी सौरभ गोखले सज्ज

Pune Crime | बांधकाम व्यावसायिक काकडे यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, काकडेंनी दाखल केला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा