Kapil Sharma | कॉमेडियन कपिल शर्माची मोठ्या चित्रपटात वर्णी, अनेक अभिनेत्रींसोबत करणार काम, तब्बुच्या शुभेच्छा

पोलीसनामा ऑनलाइन – ‘कपिल शर्मा शो’मधून लोकप्रिय झालेला कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) आता चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. सर्व प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावणाऱ्या कपिलचे अनेक चाहते आहेत. तो आता नवीन चित्रपटात काम करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) मोठ्या पडद्यावर अभिनेत्री तब्बु आणि करिना कपूर सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपिल शर्मा आता आगामी ‘द क्रू’ (The Crew) या विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे समोर येत आहे. बहुचर्चित अशा ‘द क्रू’ चित्रपटात कपिल महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग सुरु झाले असून शुटिंगचा पहिला टप्पा देखील पार पडला आहे. दरम्यान अभिनेत्री तब्बूने (Actress Tabu) ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. तिने एक पोस्ट लिहून कपिलच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये स्वागत केले आहे.

कपिल शर्मा त्यांच्या शोमध्ये अनेक चित्रपटांचे प्रमोशन करत असतो. त्याचे अनेक कलाकरांसोबत चांगले बॉडिंग दिसून येते. याची प्रचिती या पोस्टमध्येही दिसून येत आहे. तब्बूने इन्स्टाग्रामवर त्याचा शुटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती कपिलचे कौतुक करत आहे. तब्बूने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ‘आप आये बहार आये. ‘द क्रू’ चित्रपटाचा भाग असल्याबद्दल कपिलचे मनापासून आभार. तुझ्या शोमध्ये येण्यापासून ते तू माझा सहकलाकार म्हणून काम करणं ही माझ्यासाठी कायमच आनंदाची गोष्ट आहे. तब्बूच्या या पोस्ट खाली कपिल शर्मीने ही कमेंट केली आहे. त्याच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तब्बूच्या पोस्ट खाली कपिलने कमेंट करत लिहीले आहे की,’तब्बू जी, तुमच्या पहिल्या चित्रपटापासून मी तुमचा चाहता आहे. तुम्ही दाखवलेल्या आपुलकी बद्दल धन्यवाद.’

‘द क्रू’ या विनोदी चित्रपटात कपिल शर्मा बरोबरच अभिनेत्री तब्बू, करीना कपूर (Kareena Kapoor) क्रिती सेनॉन
(Kriti Sanon) आणि अभिनेत्री शहनाज कौर गिल (Shahnaz Kaur Gill) आणि अभिनेता दिलजीत दोसांझ
(Diljit Dosanjh) अशी तगडी स्टार कास्ट असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन
(Director Rajesh Krishnan) यांनी केले आहे तर चित्रपटाची निर्मिती रिया कपूर (Rhea Kapoor) व
एकता कपूर (Ekta Kapoor) यांनी केले आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी नंदिता दास (Nandita Das) दिग्दर्शित झ्विगॅटो (Zwigato) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटात कपिल शर्माने प्रमुख भूमिका साकारली होती.
या आधी कपिलचा ‘किस किसको प्यार करूं’ (Kis Kisko Pyaar Karoon) हा चित्रपट आला होता.
त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
आता कपिल शर्मा (Kapil Sharma) नवीन चित्रपटात दिसणार असून त्याचा मोठा चाहता वर्ग या चित्रपटाची वाट पहात आहे.

Web Title :  Kapil Sharma | kapil sharma got jackpot directly doing a film with tabu and kareena kapoor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा