Kareena Kapoor Diwali Celebration | करीना कपूरने शेअर केले दिवाळी पार्टीचे इनसाइड फोटो, पाहा व्हायरल फोटोज…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील दिवाळीची एक वेगळीचं मजा आहे. अनेक कलाकार दिवाळी साजरी करतात (Kareena Kapoor Diwali Celebration). नुकतंच सोशल मीडियावर कपूर फॅमिलीने चांगलीच दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीसाठी करीना कपूर आणि सैफ अली खानने (Saif Ali Khan) मुंबईमधील आपल्या घरात दिवाळीची पार्टी ठेवली होती (Kareena Kapoor Diwali Celebration).

या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा फोटोज सोहा अली खान, सारा अली खान आणि करिश्मा कपूरने शेअर केले आहेत (Celebrity Diwali Photo ). या पार्टीमध्ये करीनाच्या सगळ्या कलाकार नातेवाईकांनी हजेरी लावली होती (Kareena Kapoor Diwali Celebration). दिवाळीसाठी करीनाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली असून, तिच्या पारंपारिक लूकने (Kareena Kapoor Diwali Look) चाहत्यांना घायाळ केलं. तसेच सैफ अली खानने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.

व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये करीना कपूर, सैफ, सोहा (Soha Ali Khan) आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) एकत्र पोज देताना दिसत आहे. तसेच सारा (Sara Ali Khan) आणि इब्राहिमने (Ibrahim Ali Khan) सुद्धा या पार्टीमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधलं. फोटोमध्ये करिना आणि सोहामध्ये अगदी चांगली बॉन्डिग दिसत आहे. तसेच फोटोमुळे कित्येक दिवसांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) चाह्त्यांना दिसल्या.

दरम्यान, काही फोटोंमध्ये कपूर घराणे सहपरिवारासोबत पाहायला मिळतात.
यामध्ये करिश्मा कपूर (Karishma Kapoor), रणधीर कपूर (Randheer Kapoor),
बबीता (Babita), नीतू सिंग (Nitu Singh), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सुद्धा या पार्टीमध्ये उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut On Eknath Shinde | संजय राऊतांनी काढली एकनाथ शिंदेंची औकात, म्हणाले – ‘हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांना…’

Pune Air Pollution | फटाक्यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवडची हवा बिघडली, हवेचा गुणवत्ता निर्देशांक ‘अतिवाईट’ श्रेणीत