KBC | ‘कौन बनेगा करोडपती’च्या गेममध्ये होणार नवीन बदल; अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुपरहिट फॅमिली शो म्हणजे अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC). ज्ञानाच्या बळावर खेळला जाणाऱ्या या कार्यक्रमात विद्येची, ज्ञानाची कसोटी लागते. अनेक मध्यमवर्गीय हुशार लोकांची स्वप्ने या शो मुळे पूर्ण झाली आहेत. घराघरात पहायला जाणाऱ्या या शो (KBC) चा पुढील सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल खुद्द बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

बॉलीवुडचे सुपरस्टार यांच्या खास अंदाजात, आणि स्वॅगमध्ये अनेक वर्षे यशस्वीपणे सुरु ठेवलेला ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच येणार आहे. मात्र यावेळी कौन बनेगा करोडपती 15 वा सीजन (Kaun Banega Crorepati Season 15) हा इतर सीजनपेक्षा निराळा असणार असल्याचे बिग बी (Bigg Boss) यांनी सांगितले आहे. मागील 23 वर्षात प्रेक्षकांना या मालिकेने वेळोवेळी सुखद धक्के दिले आहेत. आता या सीजनमध्येही काही तरी नवीन (Kaun Banega Crorepati 15 Twist) देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र हे काय असेल हे अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत नवीन कौन बनेगा करोडपती सीजनची घोषणा केली. यामध्ये त्यांनी कवितेच्या माध्यमातून बदलत्या जगाचे आणि खासकरुन बदलत्या भारताचे (Modern India) वर्णन केले आहे. यामध्ये देशात होणार डिजिटलायझेशन, ऑनलाइन व्यवहार, काम करण्याची पद्धत, बिझनेस करण्याची पद्धत, शिकण्याची पद्धत तसेच वागण्या – बोलण्याची, परंपरा पुढे घेऊन जाण्याची पद्धत कशी बदलली आहे. अद्यायावत होत चालली आहे हे मांडले आहे. यामध्ये भारतीय तरुणांचा (Indian Youth) वाढता प्रभाव, ज्ञान आणि त्यांची कक्षा रुंदावली असल्याचे चित्र रेखाटले गेले आहे. तरुणाई जशी बदलली आहे, देश जसा बदलत आहे आणि ज्ञान जसे बदलत आहे यामुळे आता कौन बनेगा करोडपती बदलणार आहे अशा आशयाची कविता सादर करत केली. “बदल रहा है देश, बदल रहा है कौन बनेंगा करोडपती” असे म्हणत बीग बी यांनी नवीन शो ची घोषणा केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या या ट्विटमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून प्रेक्षक आतुरतेने या कौन बनेगा करोडपती (KBC) 15 व्या पर्वाची वाट पाहत आहे. यामध्ये कार्यक्रमाच्या लोगोमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. प्रेक्षकांनी कार्यक्रम लवकरात लवकर चालू करण्याचे आवाहन केले असले तरी अद्याप कार्यक्रम कधी सुरु होणार याची तारीख देण्यात आलेली नाही.

Web Title :  KBC | kaun banega crorepati 15 promo released show will come with new flavor and twist amitabh bachchan gave a hint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘गुगली टाकून मला नाही तर पुतण्याला बोल्ड केलं…’, शरद पवारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार (व्हिडिओ)

Pune Police News | पुण्यात पोलीस अंमलदाराकडून सिनेस्टाईल पाठलाग ! ऊसाच्या शेतात पळून गेलेला गुन्हेगार ताब्यात; गावकऱ्यांकडून पोलिसांचा सत्कार

Bar Association Appeals for Enhanced Court Facilities in Pimpri-Chinchwad

Darshana Pawar Murder Case | दर्शना पवार खून प्रकरणात मोठं अपडेट, राहुल हंडोरेनं…