Khed Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन, दारू पाजून रात्रभर अत्याचार, तीन नराधमांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Khed Pune Crime News | पुण्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar Pune) मधून धक्कादायक घटना समोर येत आहे. तीन नराधमांनी हवस भागवण्यासाठी ओळखीच्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन त्यांना ड्रगचे इंजेक्शन दिले (Rape Case Pune). तसेच लॉजवर नेऊन बिअर आणि दारु प्यायला देऊन रात्रभर त्या मुलींवर अत्याचार केला. आरोपींनी अल्पवयीन मुलींचे अक्षरश: लचके तोडल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार खेड तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.14) रात्री घडला आहे.(Khed Pune Crime News)

आरोपींवर खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. तर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी हा ड्रग्स पुरवणारा सुत्रधार असून त्याने आतापर्यंत किती जणांना ड्रग्ज पुरवले आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, मंगळवारी रात्री आरोपींनी दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्स दिले.
बुधवारी सकाळी नशेत झिंगलेल्या मुली आपल्या घरी परतल्या त्यावेळी त्यांच्या पालकांच्या लक्षात ही बाब आली.
त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
राजगुरुनगर परिसरात राहणारे आणि महाविद्यालयात शिकत असलेली ही मुले, मुली आहेत.
त्यांच्या या प्रकाराची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे (PI Rajkumar Kendre) यांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महत्त्वाचा तपास सुरु आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Baramati Pune Crime News | कर्ज माफ करतो म्हणून केली शरीर सुखाची मागणी, नकार देताच गळ्यावर चाकूने वार; बारामती मधील धक्कादायक घटना

Pune Municipal Corporation (PMC) | सुविधा पुरविण्यात पुणे महापालिकेला अपयश, अवकाळी पावसामुळे रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप; त्वरीत उपाययोजना करण्याची संदीप खर्डेकर यांची मागणी

Side Effects of Covaxin | ‘कोव्हिशिल्ड’नंतर आता ‘कोवॅक्सिन’चे दुष्परिणामही संधोधनातून आले समोर, चिंता करण्याचे कारण आहे का?

Hadapsar Pune Crime News | पुणे : छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर फसवणुकीचा गुन्हा