Kiara Advani | कियारा अडवाणीला व्हायचे होते लग्नाआधीच प्रेग्नेट; बोलून दाखवली इच्छा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडच्या प्रसिद्ध जोडींपैकी (Bollywood Couples) एक असलेले अभिनेता सिद्धार्थ म्हलोत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हे लोकप्रिय कपल आहे. सिद्धार्थ व कियारा (Siddharth And Kiara) यांचा मोठा चाहता वर्ग असून त्यांच्या चाहत्यांना या कपलच्या अपडेट जाणून घ्यायच्या असतात. अभिनेत्री कियारा ही तिच्या नुकत्याच हिट झालेल्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. कियारा व सिद्धार्थ यांनी या वर्षी फेब्रुवारी मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र त्यापूर्वीच कियाराने (Kiara Advani) तिला बाळाला जन्माला घायलायचे होते अशी इच्छा बोलून दाखवली होती.

कियारा अडवाणी ही बी टाऊनच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री आहे. तिचा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सोबतचा ‘सत्यप्रेम की कथा’ बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान देखील कियाराचे ड्रेसमध्ये बेबी बंप (Kiara Baby Bump) दिसत असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. तिने ऑरेंज कलरचा प्रिंटेट पायजमा व सिक्वेल फुल स्लीव्ह टॉप घातला होता. यावेळी तिचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र यावर तिने नकार दिला. कियारा अडवाणीचा 2019 साली ‘गुड न्यूज’ चित्रपट (Good News Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. यावेळी तिने तिच्या प्रेगनेंसी (Kiara Advani Pregnancy) बाबत वक्तव्य केले होते.

अभिनेत्री कियारा अडवाणी ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी म्हणाली की, “मला गरोदर राहायचे आहे. जेणेकरून मला जे काही खायचे आहे ते मी खाऊ शकेन. मला मुलगा असो की मुलगी असो याने मला काही फरक पडत नाही. जे काही आहे ते फक्त निरोगी असावे.” कियाराचे हे विधान तेव्हा देखील खूप गाजले होते. आता पुन्हा एकदा तिची व्हिडिओ व्हायरल होत असून तिला लग्नाआधीच गरोदर व्हायचे होते ही गोष्ट चर्चेत आली आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणी (Siddharth Malhotra And Kiara Advani) यांचा
7 फेब्रुवारीला राजस्थानमधील जैसलमेर (Jaisalmer, Rajasthan) येथे शाही विवाह सोहळा पार पडला.
त्याच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर ट्रेडिंगला होते.
दोन्ही कलाकार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहेत.
सिद्धार्थ या आधी ‘मिशन मजनू’ (Mission Majnu) चित्रपटामध्ये झळकला होता.
लवकरच त्याचा ‘योद्धा’ चित्रपट (Yoddha Movie) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
तर अभिनेत्री कियारा अडवाणीकडे (Kiara Advani) अनेक बिग बजेट चित्रपट आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Morning Walk In Monsoon | पावसाळ्याच्या दिवसात अवश्य करा मॉर्निंग वॉक, कारण जाणून आनंदी व्हाल