Kidney Transplant | व्यक्तीच्या शरीरात आहेत 5 किडनी; डॉक्टरांनी केला असा चमत्कार जाणून हैराण व्हाल तुम्ही !

चेन्नई : वृत्तसंस्था –  Kidney Transplant | तमिळनाडु (Tamil Nadu) मधील चेन्नईत (Chennai) एक व्यक्ती जेव्हा किडनी ट्रान्सप्लांट (Kidney Transplant) करून जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्याच्या शरीरात एकुण 5 किडनी होत्या. होय, तुम्ही बरोबर वाचलं आहे. चेन्नईच्या एक व्यक्तीच्या शरीरात 5 किडनी आहेत. आता प्रश्न हा उपस्थित होतो की हा चमत्कार कसा घडला.

41 वर्षाचा एक व्यक्ती जेव्हा मद्रास मेडिकल मिशन (Madras Medical Mission) मधून आपल्या किडनीचे ट्रान्सप्लांट करून ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडला तेव्हा त्याच्या शरीरात एकुण 5 किडनी होत्या. 1994 मध्ये जेव्हा हा व्यक्ती 14 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या.
तेव्हा त्याने आपले पहिले ट्रान्सप्लांट केले होते.

पहिले ट्रान्सप्लांट नऊ वर्षापर्यंत चालले. यानंतर व्यक्तीने 2005 मध्ये आपले दुसरे ट्रान्सप्लांट करून घेतले.
हे ट्रान्सप्लांट पुढील 12 वर्षापर्यंत चालले पण त्याच्या पुढील 4 वर्षापर्यंत व्यक्तीला दरआठवड्याला 3 वेळा आपले डायलिसिस (Kidney Dialysis) करावे लागत होते.

डॉक्टरांनी सांगितले की, ज्या रूग्णांमध्ये गंभीर किडनीची समस्या असते त्यांची किडनी रक्तातील घाण मुत्राच्या मार्गाने बाहेर काढणे बंद करते.
जस-जसा आजार वाढतो, तसतसे किडनीचे फंक्शन डायलिसिस मशीन करू लागते.
डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे पहिले आणि दुसरे ट्रान्सप्लांट यामुळे अयशस्वी झाले
कारण त्याचे हायपरटेन्शन (Hypertension) अतिशय वाढले होते.

समस्या आणखी गंभीर तेव्हा झाली जेव्हा व्यक्तीला तीन बायपास सर्जरी (Bypass Surgery)
कराव्या लागल्या कारण त्याच्या हृदयावर वाईट परिणाम होत होता.

 

जेव्हा तिसरी किडनी ट्रान्सप्लांट करण्याची बाब समोर आली तेव्हा डॅक्टर हैराण झाले की ती शरीरात कुठे रोपन करायची.
कारण व्यक्तीच्या शरीरात अगोदरच 4 किडनी, दोन त्याच्या स्वताच्या, आणि दोन ट्रान्सप्लांट केलेल्या होत्या. पाचव्या किडनीसाठी डॉक्टरांना खुप समस्येचा सामना करावा लागत होता.
त्यापेक्षा मोठी समस्या किडनीला रक्ताच्या धमण्या जोडण्याची होती.

मागील महिन्यातच 10 जुलैला रूग्णाचे तिसरे ट्रान्सप्लांट करण्यात आले.
डॉक्टरांनी नवीन किडनी आतड्यांच्या जवळ रोपन केली आणि हृदयाच्या धमण्यांशी तिला जोडले.
डॉक्टरांनी म्हटले की, अगोदर असलेल्या चार किडनी यासाठी काढल्या नाहीत कारण त्या
काढल्या तर जास्त रक्त वाहिले असते ज्यामुळे रूग्णाचे ट्रान्स्फ्यूजन करावे लागले असते.
म्हणजे त्याच्या शरीरात नवीन रक्त टाकावे लागले असते.
असे केल्याने शरीरात अँटीबॉडी तयार झाली असती जिने नवीन किडनीला स्वीकारले नसते.

हे प्रकरण एखाद्या चमत्कारासारखे आहे. डॉक्टरांनी म्हटले की, ते आणखी काही दिवस रूग्णाची स्थिती पाहतील आणि ठरवतील की त्याची इम्यून सिस्टम व्यवस्थित काम करत आहे किंवा नाही.

 

Web Title : Kidney Transplant | viral man gets 5 kidneys after third successful transplant in chennai hospital

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police | सराईत गुंडावर MPDA कायद्याखाली कारवाई, गुंड योगेश गायकवाडची येरवड्यात रवानगी