Kiran Mane | साताऱ्यात किरण मानेंसाठी निघणार जंगी मिरवणूक; पोस्ट शेअर करत दिली माहिती

पोलीसनामा ऑनलाइन : Kiran Mane | बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi) चौथे पर्व नुकतेच पार पडले. यावेळी टॉप फाईव्ह मध्ये असलेले स्पर्धक होते किरण माने, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, अपूर्वा धोंगडे आणि राखी सावंत . यावेळी किरण मानेची खूपच चर्चा होती. हे अंतिम पर्व नक्की जिंकतील असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आला होता. मात्र झाले वेगळेच माने टॉप ३ मध्ये येऊन बाहेर पडले आणि टॉप २ मध्ये अक्षय केळकर आणि अपूर्वा नेमळेकरने बाजी मारली. यानंतर अक्षयने ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. (Kiran Mane)

किरण मानेंनी जरी यंदाचा पर्व जिंकले नसले तरी त्यांचे चाहते मात्र कमी झालेले नाहीत. सध्या या कार्यक्रमामुळे त्यांना साताऱ्याचा बच्चन अशी नवी ओळख मिळाली आहे. यादरम्यानचाच किरण मानेंनी एक पोस्ट शेअर केली आहे जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

नुकतेच किरण मानेंनी त्यांच्या मिरवणुकीचे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “काय करू या प्रेमाचं…. खूप भारावून गेलो आहे. साताऱ्याला निघालो आहे प्रवासा मध्ये जिथे जिथे थांबलो तिथे तिथे लोकांनी खूप प्रेम दिले आहे आणि थोडे पुढे जाताच हे पोस्टर पाहिले आणि डोळ्यात पाणी तरळे. सातारकर प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे माझ्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट ते शिवतीर्थपर्यंत मिरवणुकीचे आयोजन केले आहे. यासाठी मी खूप भारावलो आहे. मला खूप अभिमान वाटत आहे. असंच काम करत राहील. उद्यापासून पोस्टवर आपण बोलत राहू. यात आता एवढेच सांगेन की मी खूप खूप मनापासून आभारी आहे”. (Kiran Mane)

सध्या किरण मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना भरभरून प्रेम दिले आहे.
“तुम्ही खरे विजेते आहात”, “जाळ अन धूर संगटच”, “तुमचा अभिमान आहे”.
अशा एक ना अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. किरण मानेंनी जरी बिग बॉस 4 हे पर्व जिंकले नसले तरी
शंभर दिवस घरात टिकणं ही खूप कौतुकाची बाब आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Web Title :- Kiran Mane | bigg boss marathi 4 contestant kiran mane facebook post thanked his followers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Government Recruitment | नोकरभरतीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती स्थापन करणार

Pune Police Combing Operation | पुणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये 3765 गुन्हेगारांची झाडाझडती ! 90 सराईत गुन्हेगार गजाआड; 145 कोयते, 3 तलवार, 1 पिस्टल जप्त

Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट कोयता विक्रेत्यावर छापेमारी; गुन्हे शाखेकडून 105 कोयते जप्त