Kirit Somaiya | शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांना सोमय्यांचे चॅलेंज, म्हणाले – ‘संजय अंधारीला…’

मुंबई : किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी SRA घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांची चौकशी केली होती. यावर पेडणेकर यांनी आपण असा कोणताही प्रकार केला नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, या आरोपामुळे त्यांच्या वयोवृद्ध सासू विजया पेडणेकर (Vijaya Pednekar) यांना जबरदस्त धक्का बसला आणि त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पेडणेकर कुटुंबियांनी तसा आरोप केला आहे. यावर आता सोमय्यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Kirit Somaiya On Kishori Pednekar).

किरीट सोमय्या यांनी एकीकडे किशोरी पेडणेकरांवर जोरदार टीका करत पुन्हा दुसरीकडे पेडणेकरांच्या सासूचे निधन झाल्यामुळे संवेदना व्यक्त केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले, किशोरीताईंना ’झोपू’ ची नोटीस मिळाली आहे का? पेडणेकरांच्या ताब्यात गाळे आहेत, त्यासाठी एसआरएने नोटीस पाठवली आहे. गंगाराम बोमाया वडलाकोंडा यांना एसआरएने विचारले आहे की, तुम्ही किशोरी पेडणेकरांना राहायला जागा दिली.

सोमय्यांनी (Kirit Somaiya) पुढे म्हटले की, माझ्या तक्रारी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दाबल्या होत्या. शिंदे सरकारने आता सांगितले आहे कायदेशीर जे असेल ते करा. तुम्ही 2017 च्या शपथपत्रात लिहिले आहे की, तुम्ही तिथे राहत होत्या. कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? संजय अंधारी (Sanjay Andhari) यांना हजर करा.

किरीट सोमय्या म्हणाले, संजय अंधारी यांना देखील एसआरएने नोटीस पाठवली आहे आणि तसेच किशोरी पेडणेकर यांनी जागा दिली असा उल्लेख एसआरएने केला आहे. किश कॉर्पोरेट कंपनीला ही जागा दिलेली असून किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस कंपनी (Kish Corporate Services Company) ही किशोरी पेडणेकरांची आहे, त्यांच्याकडे शेअर्स होते. किशोरी पेडणेकर यांना चॅलेंज करतो, संजय अंधारीला हजर करा, दोन पैकी खरा कोण आहे, फोटो वेगवेगळे आहेत. किशोरीताईंनी मानलेल्या भावाला संजय अंधारी म्हणून उभे केले. सुनिल कदमला संजय अंधारी म्हणून उभे केले आहे.

सोमय्या म्हणाले, किशोरीताईंच्या घरात निधन झाले, याबद्दल आम्हाला दु:ख आहे,
मात्र गरीब झोपडपट्टीवाल्यांचे गाळे घेतलेत हे ही खरे आहे. आता त्याची चौकशी सुरु झाली आहे,
त्याचे उत्तरे द्यावे लागणार. कोर्टात अ‍ॅफिडेव्हिट दाखल केल आहे, माझा तोच मुद्दा उद्धव ठाकरे दाबत होते.
किशोरीताईंना आता नोटीस पाठवली आहे, तर मग आता त्याला कोर्टात जात किशोरीताईंनी चॅलेंज करावे.

सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, भारत सरकारला अ‍ॅग्रीमेंटची कॉपी कोणी
दिली? किशोरी पेडणेकरांनी दिली नसेल तर त्यांनी सिद्ध करावे. संजय अंधारीच्या जागी मानलेला भाऊ म्हणून संजय
कदमला उभे केले, यासंबंधी फौजदारी कारवाई व्हायला हवी. फौजदारी कारवाईसाठी पोलिसांशी बोललो आहे,
तक्रारीचा पाठपुरावा मी 2-4 दिवसात करणार आहे.

गोमाता नगर एसआरए प्रकल्पातील गाळ्यांतील सहा गाळे हडपल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
याच प्रकल्पात फ्लॅट देतो असे सांगून फसवणूक केल्याच्या तक्रारीवरुन तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातही आरोपींच्या जबाबात किशोरी पेडणेकरांचे नाव समोर आले आहे.
परंतु, यावर खुलासा करताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, जाणीवपूर्वक आपल्याला बदनाम करण्याकरता
खोटे आरोप केले जात आहेत. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya on kishori pednekar on sra scam maharashtra political news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes Reverse | दीर्घकाळ मधुमेहाने पीडित आहात का? कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 6 वनस्पतींचा आहारात करा समावेश

Pune Crime | पत्नीशी का बोलतो, असे म्हणून पतीने केला तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR