अशा काळात चुकूनही करू नका आपल्या पार्टनरला ’KISS’, अन्यथा नात्यात येऊ शकतो दुरावा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आपसातील प्रेम वाढवण्यासाठी किस करणे आवश्यक आहे. चुंबनाने नात्यात मजबूती येते, कदाचित तुम्ही असा विचारही केला नसेल. परंतु तुम्हाला माहित आहे का, किस करण्याचे फायदे आहेत तसेच काही नुकसान सुद्धा आहे. आज आम्ही आपल्याला किस करण्याने होणार्‍या आजारांविषयी सांगणार आहोत. किस करण्याने आपल्शा शरीरात अनेक प्रकारचे आजार सुद्धा उत्पन्न होण्याचा धोका असतो.

होऊ शकतात हे आजार

सर्दी/ताप –

सर्दी किंवा ताप असेल तर किस न करणेच चांगले ठरते. अशावेळी जर पार्टनरला किस केले तर एका व्यक्तीच्या शरीरातील जर्म्स दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात जातात. ज्यामुळे दोघांचे शारीरीक नुकसान होण्याचा धोका असतो.

इन्फेक्शन –

किस करण्याने तोंडातील लाळ एकमेकांच्या तोंडात जाते, ज्यामुळे इन्फेक्शन पसरण्याची भीती असते. किस करण्याने एका व्यक्तीच्या शरीरातील आजार दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात जातो.

हिरड्या आणि दातांच्या वेदना –

जर तुमच्या पार्टनरला दात किंवा हिरड्यांची काही समस्या असेल तर किस करणे नुकसानकारक ठरू शकते.

मेनिन्जायटिस –

मेनिंजायटिस एक संसर्गजन्य रोग आहे, जो मेनिन्जेसमध्ये सूज असल्याने होतो. मेनिन्जेस हे मेंदूचे सुरक्षा कवच असते. मेनिन्जेस मेंदू आणि मणक्यांना झाकून ठेवते. मेनिन्जायटिसची सर्वात सामान्य लक्षणे डोकेदुखी, मान आखडण्यासह ताप येणे ही आहेत. असे झाल्यास सुद्धा किस करणे टाळले पाहिजे.