Kolhapur ACB Trap | भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागणाऱ्या लिपिकावर एसीबीकडून FIR

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – निवृत्त सहायक शिक्षकाकडे (Retired Teacher) भविष्य निर्वाह निधीची (Provident Fund) रक्कम देण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) वेतन व भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) विभागातील वरिष्ठ लिपिक उत्तम बळवंत कांबळे Senior Clerk Uttam Balwant Kamble (वय-46) यांच्या विरुद्ध कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Kolhapur ACB Trap) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत निवृत्त शिक्षकाने कोल्हापूर एसीबीकडे (Kolhapur ACB Trap) तक्रार केली आहे.

तक्रारदार हे किणी हायस्कुल (Kini High School) येथे सहायक शिक्षक म्हणून कार्य़रत होते. निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधीतील (PF) रक्कम मिळण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. त्या अर्जावर प्रस्ताव तयार करुन पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात (Deputy Director of Education) पाठवण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार हे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक कांबळे यांना भेटले होते. तक्रारदार यांच्या फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन फाईल मंजूर करुन सरकारी कोषागारात (Government Treasury) पाठवण्यासाठी कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
(Kolhapur ACB Trap) 22 ऑगस्ट रोजी तक्रारी अर्ज दिला होता.
त्यानुसार 23 ऑगस्ट रोजी कोल्हापूर एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता,
तक्रारदार यांचे भविष्य निर्वाह निधीचे काम करण्यासाठी उत्तम कांबळे याने तडजोडी अंती 23 हजार रुपये लाच
मागितल्याचे निष्पन्न झाले.
कोल्हापूर एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि.27) लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात (Laxmipuri Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे (ACB Pune Region) पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे
(Pune ACB SP Rajesh Bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwan)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar),
पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबर्गेकर (PSI Sanjeev Bambargekar), पोलीस अंमलदार शरद पोरे,
सुनील घोसाळकर, रुपेश माने यांच्या पथकाने केली.

Web Title :- Kolhapur ACB Trap | FIR by ACB against the clerk who demanded Rs 25 thousand bribe to pay provident fund amount

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात बारामतीचे तत्कालीन DySP नारायण शिरगावकर आणि पो. नि. भाऊसाहेब पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; सध्या पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले ACP शिरगावकार म्हणाले….

Pune Yevlewadi DP | येवलेवाडीचा विकास आराखडा जागांची मालकी पाहूनच केल्याची जोरदार चर्चा; भूसंपादन झालेले नसतानाही कात्रज-कोंढवा रस्ता – टिळेकरनगर – पानसरेनगर डी.पी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू