Kolhapur News | कोल्हापूर : सेवा बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Kolhapur News | कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यात (Kurundwad Police Station) पोलीस नाईक अरुण बालाजी नागरगोजे Police Naik Arun Balaji Nagargoje (वय-38 सध्या रा. कुरुंदवाड मुळ रा. पाटोदा खुर्द, ता. जळकोट जि. लातूर) यांचे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. त्यांच्या अचानक निधनामुळे पोलीस ठाण्यासह शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.(Kolhapur News)

अरुण नागरगोजे गेल्या चार वर्षापासून कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. हेरवाड, अब्दुल लाट सारख्या संवेदनशील गावाची जबाबदारी त्यांच्यावर होती. गुरुवारी रात्रपाळी असल्याने रात्री हेरवाड, अब्दुल लाट, शिरदवाड परिसरात पेट्रोलींग करत होते. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकीरी सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस (API aviraj Phadnis) मुंबई येथील नियोजित बैठकीसाठी जाणार होते. त्यामुळे नागरगोजे यांनी त्यांना पहाटे इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सोडून आले होते.

पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना छातीत दुखत असल्याने ते शहरातील एका खासगी रुग्णालयात गेले होते.
मात्र, दवाखान्याच्या आवारातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई असा परिवार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On BJP | पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच ‘त्या’ नेत्यांची अडचण होती, जयंत पाटलांचे प्रत्युत्तर