Laptop Charging | तुमचा लॅपटॉप चार्ज होत नाही? राहा टेन्शन फ्री, जाणून घ्या दुरुस्तीची सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक वेळा आपण लॅपटॉप (Laptop Charging) चार्ज करण्यासाठी लावल्यानंतर काही वेळा तो लॅपटॉप चार्ज होत नाही. तसेच, चार्जिंग (Laptop Charging) लावल्यानंतर नोटिफिकेशन देखील दिसत नाही. आणि टास्कबारवरचा बॅटरीचा आयकॉनही बॅटरी चार्ज होतंय का हे देखील दिसत नाही. मात्र, अशी परिस्थिती निर्माण झाल्यांनतर आपणाला टेन्शन येतं. आपणाला वाटत की यात प्रॉब्लेम अधिक आहे. मात्र, असं काही नसतं. त्यासाठी अशा परिस्थिती मध्ये नेमकं काय करायला हवं. हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

1. सर्व केबल कनेक्शन्स तपासणे आवश्यक –

Laptop चार्ज होत नाही. असं समजल्यावर समस्यानिवारण (Troubleshooting) करण्याअगोदर सर्व केबल कनेक्शन्स व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे. प्लगमध्ये पिन व्यवस्थित बसली आहे ना, तसंच लॅपटॉपच्या चार्जिंग (Laptop Charging) पोर्टमध्ये केबल व्यवस्थित बसली आहे का? हे चेक करायला हवं. एकदा प्लग बदलून दुसऱ्या प्लगमध्ये पिन घालून बघावी. तसेच, आपण इलेक्ट्रिक विस्तार बोर्डवरून लॅपटॉप (Laptop) चार्जरसाठी कनेक्शन घेतलं असेल, तर एकदा थेट मुख्य बोर्डवरच्या प्लगमध्ये पिन लावून बघणे आवश्यक आहे. याचबरोबर AC adapterचं कनेक्शन व्यवस्थित आहे का बघणे.

2. बॅटरी काढून चेक करणे –

ज्या Laptop ना Removable Battery म्हणजेच काढता येण्यासारखी बॅटरी असेल त्यांच्यासाठी हा पर्याय लागू आहे. लॅपटॉप शट डाउन करावा, चार्जरची पिन प्लगमधून काढावी आणि लॅपटॉपला जोडलेली केबल देखील काढावी. त्यानंतर बॅटरी बाहेर काढावी. त्यानंतर काही वेळ पॉवर बटण दाबून ठेवावं, यामुळे सिस्टीममध्ये थोडी ऊर्जा शिल्लक राहिली असली, तर ती वापरली जाऊ शकते. नंतर लॅपटॉपला चार्जर जोडावा आणि लॅपटॉप सुरु करण्याचा प्रयत्न करावा. लॅपटॉप योग्य प्रकारे सुरू झाला, तर चार्जिंगची समस्या बॅटरीत असते. बॅटरी पुन्हा लॅपटॉपमध्ये बसवण्या पूर्वी बॅटरी कप्पा स्वच्छ करावा. त्यानंतर बॅटरी योग्य प्रकारे बसवावी. यानंतर लॅपटॉप योग्य प्रकारे सुरू झाला नाही, तर लॅपटॉपची बॅटरी ऑफ झाल्याची शक्यता असते.

 

3. योग्य चार्जर आणि पोर्ट्सचा वापर –

Laptop च्या बॅटरीला योग्य ऊर्जा मिळत आहे की नाही, हे बघावे.
तसेच, लॅपटॉपला (Laptop) चार्जिंगसाठी एकच पोर्ट असतो, परंतु, अलीकडे नव्या लॅपटॉप्सना USB-C चार्जर्सच्या (Laptop Charging) माध्यमातून चार्ज करणे शक्य असते.
हे चार्जर्स यूएसबी-सी पोर्टला कनेक्ट करावे लागतात. लॅपटॉपला असलेल्या सर्व यूएसबी-सी पोर्ट्स पुरेसं ऊर्जा व्यवस्थापन करू शकतो.
असं नाही. म्हणून दुसऱ्या यूएसबी-सी पोर्टला चार्जर कनेक्ट करून बघणे आवश्यक.
अनेकदा USB-C पोर्ट्स फक्त डेटा ट्रान्स्फरसाठीच वापरण्यासाठी राखीव असतात.
तसेच, मूळ चार्जरच वापरावा. इतर कोणता चार्जर वापरल्यास लॅपटॉप चार्जिंगला वेळ लागू शकणार आहे.

4. केबल आणि पोर्ट चांगल्या स्थितीत आहे का?

चार्जरची (Laptop Charging) पॉवर कॉर्ड / केबल आणि पोर्ट सुस्थितीत आहे का?, याची एकदा तपासणी करून घ्यावी.
लॅपटॉपला (Laptop) चार्जर लावल्यानंतर जादा गरम होत असेल अथवा जळल्यासारखा वास येत असेल, तर त्यावेळी तशा चार्जरचा वापर करू नये.

 

Web Title : Laptop Charging | how to solve laptop battery or charging problems at home easily

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Metro Traffic | मेट्रोच्या कामासाठी संभाजी पुल (लकडी पुल) 20 दिवस दररोज रात्री 7 तास राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Chandrasekhar Bavankule | ’14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा?’

Coronavirus | काय सांगता ! होय, कोरोनाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेने केले तब्बल 2 हजार कोटी रूपये खर्च