10 वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 3591 जागांसाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत 10 वी पास तरुणांसाठी रेल्वेत सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेने अ‍ॅप्रेंटिस पदासाठी 3591 बंपर भरती जाहीर केली आहे. भारतीय रेल्वेच्या रेल्वे भरती सेल, पश्चिम रेल्वे, मुंबई विभागाने भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या पश्चिम विभागाच्या वेबसाईट www.rrc-wr.com वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून आहे.

उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआयमध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

1) पदाचे नाव : अप्रेंटिस

2) पदांची एकूण संख्या : 3591

3) पात्रता : या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10 उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित ट्रेड मधील ITI सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे.

4) वयोमर्यादा : उमेदवाराचे वय कमीत कमी 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे.

5) अर्जाचे शुल्क : खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही.