LIC Special Revival Campaign | बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा करू शकता सुरू, जाणून घ्या कोणत्या अटींचे करावे लागेल पालन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  LIC Special Revival Campaign | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (Life Insurance Corporation of India) लॅप्स्ड म्हणजेच बंद पडलेली पॉलिसी (lapsed policies) पुन्हा सुरू करण्यासाठी दोन महिन्याचे एक स्पेशल कॅम्पेन सुरू केले आहे (special campaign to re-launch lapsed policies). ज्याची घोषणा एलआयसीकडून सोमवारी करण्यात आली आहे. या कॅम्पेनचे नाव स्पेशल रिव्हायवल कॅम्पेन (LIC Special Revival Campaign) ठेवण्यात आले आहे, जे 23 ऑगस्टपासून सुरू होऊन 22 ऑक्टोबर 2021 पर्यंत चालेल. यामध्ये विलंब शुल्क कमी करण्यात आले आहे.

अशी मिळेल मदत

एलआयसीनुसार, स्पेसिफिक एलिजिबल प्लान पहिल्या अनपेड प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षाच्या आत रिव्हायवल केला जाऊ शकतो. यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
जी पॉलिसी प्रीमियम भरण्याच्या कालावधीत समाप्त झाली आहे आणि पॉलिसीचा कालावधी पूर्ण झालेला नाही, ते या अभियानात रिव्हायव्हल होण्यास पात्र आहेत.
मात्र, टर्म इन्श्युरन्स आणि हाय रिस्क स्कीम्स या कॅम्पेनच्या बाहेर ठेवल्या जातील.

यावर सवलत नाही

एलआयसीने म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता, भरलेल्या एकुण प्रीमियमच्या आधारावर टर्म इन्श्युरन्स आणि हाय रिस्क योजनांशिवाय इतरांसाठी विलंब शुल्कात सवलत दिली जात आहे.
वैद्यकीय आवश्यकतांवर कोणतीही सवलत नाही.
योग्य आरोग्य आणि सूक्ष्म विमा योजनासुद्धा विलंब शुल्क सवलतीसाठी पात्र आहेत.

 

विलंब शुल्कावर मिळेल सूट

1 लाख रुपयांपर्यंत एकुण प्राप्त प्रीमियमसाठी विलंब शुल्कात 20 टक्के सूट दिली जाईल.
मात्र, सवलत रक्कम 2,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

1-3 लाख रुपयांच्या एकुण प्राप्त प्रीमियमसाठी विलंब शुल्कात 25 टक्केची सवलत दिली जाईल.
ही सूट 2,500 रुपयांपेक्षा जास्त नसेल.

  एकुण प्राप्त प्रीमियम 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, विलंब शुल्कात 30 टक्केची सूट मिळेल,
पण सवलत रक्कम 3,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.

अडचणीमुळे जमा करता आला नाही प्रीमियम

एलआईसीने म्हटले की, हे अभियान त्या पॉलिसीधारकांच्या लाभासाठी सुरू करण्यात आले आहे.
ज्यांची पॉलिसी समाप्त झाली होती कारण ते अपरिहार्य परिस्थितीमुळे वेळेवर प्रीमियम भरू शकले नव्हते. विमा कव्हर पूर्ववत करण्यासाठी जुन्या पॉलिसीला पुनरज्जीवित करणे नेहमी चांगले असते.

 

Web Title : LIC Special Revival Campaign | the closed lic can be started again know which conditions will have to be followed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Farmer Suicide | आत्महत्येनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील पण, माझे वडील पुन्हा परत येतील का?

Kolhapur Crime | धक्कादायक ! ‘बेपत्ता’ मुलीला सावत्र पित्यानेच पंचगंगा नदीत फेकले

आता WhatsApp द्वारे बुक करू शकता कोविड व्हॅक्सीनेशनचा स्लॉट, जाणून घ्या सोपी पद्धत