Loan Processing Fees | ‘या’ बॅंकेने केली लोन प्रोसेसिंग फी माफ; कर्जदारांना होणार फायदा

पोलीसनामा ऑनलाइन – Loan Processing Fees | सध्या अनेक नवीन गाड्या खरेदी केल्या जात आहेत. यासाठी बॅंकेकडून कर्ज घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. घर खरेदी करण्यासाठी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात बॅंकेकडून गृह कर्ज घेत आहेत. बॅंकेकडून होम लोन किंवा ऑटो लोन घेणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’ (Union Bank of India) तर्फे आता त्यांच्या कर्जदारांकडून प्रोसेसिंग फी पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टू व्हिलर, फोर व्हिलर किंवा होम लोन घेताना बॅंकेला प्रोसेसिंग फी (Loan Processing Fees) द्यावी लागते. मात्र आता ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’ कडून कर्जदारांची ही फी पूर्णपणे माफ (Processing Fees Waived) केली आहे. ज्या कर्जदारांचा क्रेडिट स्कोर (Credit score) 700 च्या पुढे आहे अशा कर्जदारांना ही सुविधा मिळणार आहे.

‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’ या बॅंकेने कर्जदारांच्या सोयीसाठी ही लोन प्रोसेसिंग फी काही काळासाठी माफ केली आहे.
कर्जदारांनी 16 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर 2023 दरम्यान कर्जासाठी अर्ज केल्यास त्यांना ही प्रोसेस फी माफ करण्यात येणार आहे. या कालावधीत अनेक लोक हे गाड्या खरेदी करत असतात आणि होम लोन देखील घेत असतात. अशावेळी कर्जदारांसाठी ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’ने ही खास ऑफर सुरु केली आहे. जर दुसऱ्या बँकेचे / एनबीएफसी होम लोन किंवा कार लोन ट्रान्सफर केले तरी देखील या सुविधेचा लाभ घेता य़ेणार आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) गेल्या काही दिवसांत रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बॅंक लोन (Bank loan) हे स्वस्त झालेले नाही. तरी देखील ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’ या बँकेने कर्जदारांसाठी ही खास ऑफर दिल्याने कर्जदारांना याचा फायदा होणार आहे.

(Union Bank of India) ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’ तर्फे होम लोन व ऑटो लोन (Auto Loan) घेणाऱ्या कर्जदारांसाठी ही खास ऑफर तर दिलीच
आहे पण त्याचबरोबर एफडी (FD) वरील परतावा देखील चांगला दिला आहे. त्यामुळे गुंतवणूक करणारे खातेदार देखील
या ऑफरमुळे खूश आहे. एफडीवर वार्षिक 3 ते 7 टक्के दराने व्याज (FD Rate of interest) दिले जात आहे.
तसेच खास ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 बेसिस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज दिले जात आहे.
‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’मध्ये अगदी सात दिवस ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
बँकेकडून टॅक्स सेव्हिंग एफडीवर (Tax Saving FD) वार्षिक 6.70% व्याज दिले जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांना 5 ते 10 वर्षांच्या FD वर वार्षिक 7.20% व्याज दिले जात आहे.
त्यामुळे युनियन बॅंक ऑफ इंडियाकडून खातेदारांसाठी आणि कर्जदारांसाठी (Home Loan Processing Fees)
खास ऑफर आहेत. अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kartikey Malviya – Ragini | अभिनेता कार्तिकेय मालवीयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ गाणं प्रदर्शित!