Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार बंद – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Lok Sabha Election 2024 | जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या ७ मे रोजी बारामती व १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.(Lok Sabha Election 2024)

मुंबई मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट १८६२ चे कलम ५ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मुळशी तालुक्यातील पौड, बावधव खुर्द, पुरंदर तालुक्यातील वाल्हा, दौंड तालुक्यातील केडगांव, मलठण, रावणगाव व बोरीपार्धी, बारामती तालुक्यातील पणदरे, मुर्टी, करंजेपुल, निरावागज, उंडवडी सुपे व सोनगाव, इंदापूर तालुक्यातील लाकडी, कळस, काटी, टणू, निरवांगी व खोरोची व भोर तालुक्यातील भोर या ठिकाणचे आठवडे बाजार ७ मे रोजी बंद राहतील.

मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार १३ मे रोजी बंद राहतील.

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट १८६२ मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MIM Asaduddin Owaisi Sabha In Pune | ‘एमआयएम’ची पुण्यात 7 मे रोजी सभा, असदुद्दीन ओवेसी येणार