Lok Sabha Election | गरज पडल्यास लोकसभा भाजपच्या चिन्हावर लढवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विश्वासू मंत्र्याचा दावा

ADV

सावंतवाडी : Lok Sabha Election | सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा करत आहे. मात्र, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा येथून इच्छूक असल्याने निवडणुकीच्या तोंडावर मोठी गडबड होऊ शकते. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की, किरण सामंत लोकसभा निवडणुकीत उतरत असतील तर त्यांचा प्रचार करून निवडून आणू. तर दुसरीकडे राणे यांनी याबाबत वेगळे वक्तव्य केले आहे. (Lok Sabha Election)

याच संदर्भात बोलताना केसरकर म्हणाले, पालघरमध्ये भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेत आमच्यातील एकाने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे? (Lok Sabha Election)

केसरकर म्हणाले, माझ्या खांद्यावर कोल्हापूर व मुंबई शहर अशा दोन ठिकाणच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. यातील कोल्हापूरच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने मुंबई शहराला आठवड्यातून तीन दिवस वेळ देणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाबद्दल बोलताना केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटले की, हा लोकसभा मतदारसंघ भाजपाचाच आहे. हा मतदारसंघ भाजपाच लढणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छूक आहेत,
याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, या मतदारसंघात भाजपाच उमेदवार देणार आहे.

लोकसभेची निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, हा माझा प्रश्न नाही.
उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल. पक्ष जो उमेदवार देईल, तो आम्ही सर्व जण निवडून आणू.

शिवसेना ठाकरे गटाने आगामी निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी
खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे गटाचा उमेदवार विरूद्ध
शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार अशी लढत येथे दिसून येईल. तत्पर्वी ही जागा कोणाला भाजपाला मिळणार की शिंदे गटाला,
हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap Case | लाच घेताना पुण्यातील उप लेखापरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात