Lonavala Traffic Jam | सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी; लोणावळा शहरात वाहतूक कोंडी

लोणावळा: Lonavala Traffic Jam | पाऊस झाल्याने सायंकाळनंतर लोणावळा परिसरात आल्हाददायक गारवा अनुभवायला मिळत आहे. शनिवारी दुपारनंतर लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पवना धरण परिसरातही पर्यटकांची गर्दी झाली होती.

सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर परिसरात पर्यटकांची गर्दी झाली. लोणावळा, खंडाळा, पवनानगर परिसरात पर्यटकांच्या वाहनांमुळे कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवार, रविवारच्या सुट्टीला जोडून सोमवारी बकरी ईदची सुट्टी जोडून आल्याने शनिवारी सकाळपासून मुंबई, ठाणे परिसरातील पर्यटकांनी गर्दी केली होती. लोणावळ्यात अद्याप पाऊस सूरू झाला नाही. दोन दिवसांपूर्वी लोणावळा शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली.

शहरातील हॉटेल, फार्म हाऊस, बंगले पर्यटकांनी मुक्कामाचे नियोजन करून सोमवारपर्यंत आरक्षित केले असल्याची माहिती हॉटेल चालकांनी दिली. शहर परिसरातील कोंडी दूर करण्यासाठी लोणावळा ग्रामीण, शहर पोलिसांकडून पवनानगर परिसर, कार्ला फाटा, मळवली, भाजे लेणी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mutual Funds | 15x15x15 इन्व्हेस्टचा हा नियम तुम्हाला बनवू शकतो करोडपती, जाणून घ्या काय आहे तो?

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : कोयत्याने वार करुन दहशत माजवणाऱ्या भाईच्या आवळल्या मुसक्या