Maharashtra Cabinet Decision | बारामतीसह राज्यात ‘या’ ६ ठिकाणी सुरू होणार नर्सिंग महाविद्यालय, मंत्रिमंडळातील ‘हे’ १० निर्णय जाणून घ्या!

मुंबई : Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत राज्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकार लवकरच जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासंबंधीचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.(Maharashtra Cabinet Decision)

याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय, तसेच एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसंबंधी महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

हे आहेत मंत्रिमंडळ बैठकीतील १० महत्वाचे निर्णय

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार रुपये.
  • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
  • राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार , गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय
  • भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार कि.मी. रस्ते व पुलाची कामे
  • ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा, ना तोटा तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार
  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा.
  • उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार. राज्यातील कमी विकसित भागांना फायदा
  • सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा करणार विकास
  • औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार. ५० टक्के मुद्रांक शुल्क सवलत

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत

तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य

Pune Sahakar Nagar Crime | दुसर्‍या कंपनीला परस्पर माल विकून 32 लाखांचा घातला गंडा; 8 जणांवर गुन्हा दाखल