Maharashtra Governement Holidays | नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना 24 सार्वजनिक सुट्ट्या; अजित पवार मात्र नाराज, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र सरकारने येत्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या (Maharashtra Governement Holidays) जाहीर केल्या आहेत. या वर्षी एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. मात्र, त्यातील चार सुट्ट्या साप्ताहिक सुट्ट्यांच्या (Maharashtra Governement Holidays) दिवशी येत असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या चार सुट्ट्यांना मुकावे लागणार आहे. महाशिवरात्र, रमजान ईद, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि लक्ष्मीपूजन या चार सुट्ट्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आल्याने त्यांची अतिरिक्त सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या सरकारी सुट्ट्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी, महाशिवरात्री १८ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी, रंगपंचमी ७ मार्च, गुडीपाडवा २२ मार्च, रामनवमी ३० मार्च, महावीर जयंती ४ एप्रिल, गुड फ्रायडे ७ एप्रिल, बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, रमजान ईद २२ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बुद्धपौर्णिमा ५ मे, बकरी ईद २९ जुलै, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट पारसी नववर्ष आरंभ, ईद ई मिलाद २८ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, दसरा २४ ऑक्टोबर, १२ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन, गुरुनानक जयंती २७ नोव्हेंबर, ख्रिसमस २५ डिसेंबर, अशा आहेत. (Maharashtra Governement Holidays)

हल्ली शहरी भागातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ५ दिवस काम करावे लागते,
तर ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना सर्व रविवारांसह दुसरा व चौथा शनिवार सुट्टी असते.
या सुट्ट्या, सरकारी सुट्ट्या, तसेच त्यांच्या रजा यांची बेरीज करता सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण १६५ दिवसांपर्यंत सुट्ट्या मिळतात. अजित पवारांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title :- Maharashtra Governement Holidays | next year maharashtra government employees got 24 holidays but ajit pawar offset on holidays

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sudipto Sen | ‘द केरळ स्टोरी’च्या दिग्दर्शकाची नदाव लॅपिड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया

Aurangabad Crime | मुलीला पळवल्याच्या आरोपावरून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण; औरंगाबादमधील घृणास्पद प्रकार

Nashik Crime | पैशांसाठी नातवानेच केली आजी-आजोबांची निर्घृण हत्या; नाशिकमधील प्रकार