Mangdewadi Katraj Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mangdewadi Katraj Pune Crime News | अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यावर बलात्कार केला (Minor Girl Rape Case Pune). याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) 20 वर्षाच्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार मांगडेवाडी येथे डिसेंबर 2023 ते 8 मे 2024 या कालावधीत घडला आहे.

याबाबत पीडित मुलीने गुरुवारी (दि.9) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिपक संजय भैरवा
Deepak Sanjay Bhairawa (वय-20 रा. पाली, ता. जि. पाली, राजस्थान) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 376/3, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी यांची डिसेंबर 2023 मध्ये ओळख झाली. आरोपीने पीडितेला जाळ्यात ओढून तु मला खुप आवडते, आपण दोघे लग्न करु, सेटल होऊ असे बोलून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बलात्कार करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

पुणे : एका 31 वर्षीय युवतीसोबत मैत्रिकरुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ (Nude Video Viral) काढून व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच आरोपीच्या मित्राने देखील पीडित युवतीसोबत अश्लील चाळे करुन मानसिक त्रास दिला.
हा प्रकार सन 2022 पासून मे 2024 या कालावधीत पीडित महिलेच्या घरी घडला आहे.
याप्रकरणी पीडेत युवतीने कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार केली आहे. यावरुन जुबेर मोहम्मद शाकीर मन्सुरी Zuber Mohammed Shakir Mansuri (वय-32 रा. झाशी, उत्तर प्रदेश), मोईन खान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : चोरट्यांना पोलीस उपनिरीक्षकाने हटकले, दोघांकडून थेट गोळीबार; भरदिवसा घडलेल्या घटनेने तळेगावात खळबळ