Manoj Jarange Patil-Maratha Reservation Andolan | मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटींचा आकडा, जरांगे म्हणाले – “नावाचा वापर करून पैसे लुटण्याचे काम…”

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Manoj Jarange Patil-Maratha Reservation Andolan | लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) संपताच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आपले उपोषण चालू केले. राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी भेट दिल्यानंतर एक महिन्यांसाठी हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

या दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळे वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. मराठा आंदोनलनाच्या नावाखाली सरकारकडून कामे घेतली आहेत.

काहींनी पैसेही घेतले आहेत. हा आकडा छोटा मोठा नसून थेट १०० कोटींचा आहे. आपल्या नावाचा वापर करून पैसे लुटण्याचे काम झाले आहे. त्यांची नावे जाहीर करावीत असे आव्हान जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांना दिले आहे.

त्यांच्या आरोपामुळे नक्की प्रकरण काय आहे याची चर्चा सुरू झाली आहे. मनोज जरांगे यांनी याबाबत शंभूराज देसाई यांना आवाहन केले आहे.

या पूर्वीही जरांगे पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री यांच्या ओएसडी वर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे १०० कोटीची कामे देणारा आणि कामे घेणारा कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपोषणाबाबत जरांगेंनी नवा अल्टीमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, यानंतर ही मागणी पूर्ण झाली नाही तर मराठा समाज विधानसभा निवडणुकीत उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gautam Adani | गौतम अदानी यांनी खरेदी केली आणखी एक सीमेंट कंपनी, 10442 कोटीत डील फायनल; काय आहे पूर्ण प्‍लान?

NDA Modi Govt | स्वयंपाक घरासाठी गुड न्यूज, आता भाज्यांवर लक्ष ठेवणार सरकार, भाव वाढल्यास हस्तक्षेप करणार

Lonikand Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार