Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | धनगर आरक्षणाचा उल्लेख करत जरांगेंचा भुजबळांना इशारा, म्हणाले – ”आम्हाला आव्हान देऊ नका, अन्यथा…”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal | मी मागे भुजबळांना धनगर आरक्षणाबाबत (Dhangar Reservation) भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. पण, अद्याप त्यांनी ती स्पष्ट केलेली नाही. ओबीसीतील १२ बलुतेदार जातींना आरक्षणाचा (OBC Reservation) लाभ मिळू दिला जात नाही. त्यांची ओबीसीत वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी आहे. या मागणीला आमचा पाठिंबा आहे. भुजबळ आव्हानं देऊन, राजकीय स्वार्थासाठी सगळं आरक्षण घालवून बसतील. त्यांनी उगाच आम्हाला आव्हान देऊ नये, अन्यथा काहीही होऊ शकतं, असा इशारा मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ (Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal) यांना दिला आहे.

मनोज जरांगे यांनी आज पुण्यातील मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे म्हणाले, माझी त्यांना (छगन भुजबळ) पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अशी अव्हानं देऊ नये. कारण, आम्हाला गोरगरिबांचं वाटोळं
करायचं नाही. कोणाच्याही मुलांचं वाटोळं करून आम्हाला आमची पोरं मोठी करायची नाहीत.

जरांगे म्हणाले, आम्हीसुद्धा पुराव्यांशिवाय बोलत नाही. महाराष्ट्रातील ओबीसींनी भुजबळांना समजून सांगावं,
तुमच्या राजकीय स्वर्थासाठी गोरगरीब ओबीसींचं वाटोळं करू नका. भुजबळांना ओबीसींची काळजी नाही. त्यांना केवळ त्यांचा राजकीय स्वार्थ महत्त्वाचा आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ…
जरांगे यांच्यावर टीका करताना भुजबळ यांनी म्हटले होते की, त्यांच्या झुंडशाहीसमोर नमते घेऊन सरकारने त्यांना मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू केले आहे. सगेसोयरे वैगरे मागण्यांमुळे भटके-विमुक्त, वंचित, ओबीसींच्या आरक्षणावर घाला घातला जात आहे.

आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयात दाद मागणे, आक्रोश व्यक्त करणे,
असे मार्ग आमच्यासमोर उरलेत. जरांगेंच्यात हिमंत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान देऊन दाखवावे.
जरांगे पाटलांएवढी दुसरी ज्ञानी व्यक्ती देशात नाही. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर
करावा आणि मंडल आयोगाला संपवण्याचे काम करून दाखवावे, असे आव्हान भुजबळ यांनी जरांगेंना दिले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे स्थानबद्ध कारवाईचे शतक, आयुक्तांची एका वर्षात ऐतिहासिक कामगिरी

डेटिंग ॲपवरील ओळख पडली महागात, पुण्यातील तरुणीला 27 लाखांचा गंडा

पुणे : जागा विक्रीच्या बहाण्याने महिलेची 1 कोटीची फसवणूक, वकिलासह चार जणांवर FIR; दोघांना अटक

दोन कंपन्यांनी एकाच वितरकाला घातला गंडा ! हाय स्पीड मोटार लावून लो स्पीड ई दुचाकी असल्याचे सांगून केली फसवणूक

Shiv Sena Shinde Group | मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर शिंदे गट आक्रमक, ”छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा”