Maratha Reservation Row | ‘महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर…’, मराठा नेत्याचा सरकारला इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maratha Reservation Row | मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण 50 टक्क्यातून द्या किंवा 50 टक्क्याच्या बाहेरुन द्या. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 13 वा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत आहे. जर त्यांच्या प्रकृतीला बरे वाईट झाले तर महाराष्ट्र सरकारला महाग पडेल. महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर कुठल्याही पद्धतीने आरक्षण द्या, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिला आहे. नागपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Maratha Reservation Row)

दिलीप जगताप म्हणाले, आरक्षणाची मर्यादा वाढवा, हे राज्य सरकारच्या हाती नाही हे आम्हाला माहिती आहे. मात्र जर राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत जावं, पाहिजे तर त्यांचे तिकीट मी काढतो. तिथे मोदींना सांगावं, आम्हाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नाही. ताबोडतोब मर्यादा वाढवा आणि आम्हाला आरक्षण द्या, आता ओबीसी समाजाने काही उपोषणाला बसलेत त्यांचा बोलविता धनी कोण आहे. दोन समाजात फूट पाडण्याचा काहींचा राजकीय प्रयत्न असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. (Maratha Reservation Row)

याशिवाय मराठा आरक्षणाच्या विरोधातील सर्व सुत्र नागपूरमधून हलातात, शोधा, मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल
तर सरसकट द्या, कुणबी वैगैरे शोधत काय बसता? ओबीसींचं आंदोलन राजकीय स्टंट आहे.
आम्ही ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागितले नाही. आम्ही आरक्षण द्यावे अशी मागणी करत आहोत.
तुम्ही कशाला रस्त्यावर उतरताय? तुम्ही रस्त्यावर उतरणार असाल तुम्ही दुसऱ्यासाठी काम करत असाल तर त्याचे
पडसाद सामाजिक संतुलन बिघडले तर त्याची जबाबदारी ओबीसी संघटनांची असेल, असा इशारा दिलीप जगताप
यांनी ओबीसी संघटनांना दिला.

ओबीसी नेत्यांची सरकारने समजूत काढावी. 16 टक्के नव्हे तर 10 टक्के द्या पण द्या.
नाहीतर त्याचा जीव जाईल अन्यथा महाराष्ट्र पेटेल. काल तिघांनी आत्महत्या केली,
स्व. अण्णासाहेबांनी त्यासाठी जीव दिला. आता अंतिम टप्प्याचा लढा आहे. हा यशस्वी झाला पाहिजे जर हा लढा
यशस्वी झाला नाही तर एकाही मराठा नेत्यांना फिरू देणार नाही. जो कोणी मराठा समाजाला आरक्षण देईल त्यांच्या
पाठिशी मराठा समाज उभा राहिल, असाही इशारा दिलीप जगताप यांनी दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

GST Fraud Case | कर चोरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई; दोन व्यक्तींना अटक