Masuta Marathi Movie | विविध सामाजिक गोष्टींवर भाष्य करणारा ‘मसुटा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाइन : सध्या मराठीमध्ये अनेक विषयांवर प्रकाश टाकणारे चित्रपट बनत आहेत. आता अशाच वेगळ्या वळणावर सामाजिक गोष्टीवर प्रकाश टाकणारा ‘मसुटा’ हा चित्रपट (Masuta Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आजवर या चित्रपटाने अनेक देशविदेशात बऱ्याच सिने महोत्सवामध्ये आपला ठसा उमटवला आहे. समाजातील एका विशिष्ट मार्गातील मनाला भिडणारी कथा या चित्रपटातून (Masuta Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काशीबाई फिल्म प्रोडक्शन आणि साई सागर प्रोडक्शन निर्मिती असलेला मसुटा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भरत मोरे आणि मनीष लोढा यांनी केले आहे. असोसिएट प्रोडूसर अजित देवरे आणि सुनील शिंदे आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन अजित देवरे यांनी केले आहे. चित्रपटात जगण्यासाठी धडपड करणारी जगावेगळी कर्म कहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. (Masuta Marathi Movie)

अजित देवळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय उत्तम पद्धतीने साकारून या चित्रपटाला एक शैलीद्वारे मनोरंजन करण्याचे काम त्यांनी केले आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक देवळे म्हणाले, “मसुटा हा जरी एक विशिष्ट कुटुंबातील कथा असला तरी परिपूर्ण मनोरंजन करणारा सिनेमा आहे. दर्जेदार निर्मिती मूल्ये, प्रसंगी गीत रचना आणि सुमधुर संगीताची भर या चित्रपटात लाभली आहे. या चित्रपटात अनंत जोग, नागेश भोसले, हृदयनाथ राणे, रियाझ मुलाणी, अर्चना महादेव, वैशाली केंडाळे, कांचन पगारे, यश मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title :- Masuta Marathi Movie | the social film masuta will be released on february 24

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Taraka Ratna Passes Away | तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि टॉलिवूड अभिनेते तारक रत्न यांचे निधन

Bhandara Crime News | धक्कादायक! कारचे स्टीअरिंग अचानक लॉक झाल्याने महाप्रसादाच्या मंडपात शिरली कार

Nagpur Crime News | BSF जवानाच्या पत्नीला अमानुष मारहाण; गर्भपात करण्यास नकार दिल्याने उचलले ‘हे’ पाऊल