Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदारसंघात युवक आणि महिला मतदान केंद्रांची जबाबदारी सांभाळणार – दीपक सिंगला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदासंघांतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आवश्यक सुविधांनी युक्त अशा निवडक २८ मतदान केंद्रांची जबाबदारी महिला व युवक सांभाळणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला (Deepak Singla IAS) यांनी दिली आहे.(Maval Lok Sabha)

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस असे सर्वच महिला कर्मचारी आहेत. युवा संचलित मतदान केंद्रावर सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी युवा वयोगटातील आहेत. आदर्श मतदान केंद्रावर सर्व सेवासुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधा देण्यात येतात. युनिक मतदान केंद्रे ही वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीम) सजविण्यात येणार आहेत. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय अशी केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ महिला संचलित, १४ युवा मतदान केंद्र आणि ६ आदर्श मतदान केंद्र असे एकूण ३४ विशेष मतदान केंद्र स्थापित केले जातील.

उरण विधानसभा मतदारसंघात (Uran Assembly Constituency) महिला संचलित मतदान केंद्र म्हणून नागरी संरक्षण गट कार्यालय बोरी प्रशिक्षण केंद्र, उर्दू नागरिक प्राथमिक शाळा उरण, उरण एज्युकेशन सोसायटीचे उरण इंग्लिश मिडीयम स्कूलमधील खोली, कोकण ज्ञानपीठ कॉलेज कार्यालयाजवळील खोली व सिटीझन हायस्कूलमधील खोली असे ५ महिला संचलित मतदान केंद्र, रायगड जिल्हा परिषद शाळेतील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळा कराळ मधील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळा दिघोडे येथील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळेतील खोली व ग्रामपंचायत कार्यालय करंजादे तळमजला हॉल असे ५ युवा संचलित मतदान केंद्र तर आदर्श मतदान केंद्र रायगड जिल्हा परिषद शाळा, खोपटे बांधपाडा नवीन इमारतीत स्थापित केले जाणार आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Vidhan Sabha) किवळे येथील पेंडसे कॉलनी विकासनगर मधील विद्याभुवन शाळेत महिला संचलित मतदान केंद्र, बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संचलित मतदान केंद्र तर रावेत येथील सिटी प्राईड शाळेतआदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत..

पनवेल विधानसभा मतदारसंघात (Panvel Assembly Constituency) के.ई. एस. आय. जे. चे वाजेकर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महिला संचलित मतदान केंद्र, के.ई. एस. हायस्कूल पनवेल येथे युवा मतदान केंद्र तर पनवेल महानगरपालिकेच्या प्री गुजराती शाळेत आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघात (Karjat Vidhan Sabha) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा (Raigad ZP Marathi School), दहिवली येथील जनता विद्यामंदिर प्राथमिक शाळा, खोपोली नगरपरिषदेची बालवाडी, शिलाफाटा येथील सह्याद्री विद्यालय व खोपोली येथील कॅरमेल कॉन्व्हेंट स्कूल अशी ५ महिला संचलित मतदान केंद्रे आहेत.

तर नेरळ येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिघर येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंजारून येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खारवई येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व खोपोली येथील जनता विद्यालयात अशी ५ युवा मतदान केंद्र मतदान केंद्र, तर अभिनव ज्ञानमंदिर प्राथमिक शाळेतील खोलीमध्ये आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत.

मावळ विधानसभा मतदारसंघात (Maval Vidhan Sabha) महिला संचलित मतदान केंद्र म्हणून जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळा खोली, युवा संचलित मतदान केंद्र म्हणून वडगाव येथील रमेशकुमार सहाणे इंग्लिश मीडियम स्कूलमधील खोली तर आदर्श मतदान केंद्र ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, लोणावळा येथे स्थापित करण्यात येणार आहेत.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात (Pimpri Vidhan Sabha) पिंपरी येथे मघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात महिला संचलित आणि युवा मतदान केंद्र, तर दापोडी येथील गणेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येतील.

मतदारांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. येत्या १३ मे रोजी अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सिंगला यांनी केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले – ‘विरोधक बावचळे असून ते वेगवेगळ्या प्रकाराचा अजेंडा सेट करणे, वेगवेगळे विधाने करणे, षडयंत्र करणं असे प्रकार करतायेत’

Pune Lok Sabha | साड्या वाटप धंगेकरांच्या कार्यकर्त्यांना भोवलं, निवडणूक भरारी पथकाकडून गुन्हा दाखल

Devendra Fadnavis | पुण्यात आणखी नवीन प्रकल्प येतील, कायापालट होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पुणेकरांना आश्वासन