
MC Stan | Bigg Boss 16 चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनने केली ‘हि’ पहिली पोस्ट
पोलीसनामा ऑनलाईन : MC Stan | छोट्या पडद्यावरचा बिग बॉस 16 या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.12 फेब्रुवारी, रविवारी रात्री 12 वाजता बिग बॉसच्या 16 व्या पर्वाचा विजेता घोषित करण्यात आला. मराठमोळ्या शिव ठाकरेला मागे टाकत एमसी स्टॅन या पर्वाचा विजेता झाला त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण ‘बिग बॉस 16’ चे विनर शिव ठाकरे किंवा प्रियंका चौधरी यादोघांपैकी असेल अशी चर्चा रंगली होती. पण ‘बिग बॉस 16’ विजेता म्हणून सलमान याने एमसी स्टॅन याचं नाव घोषित केलं. (MC Stan)
एमसी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख असं आहे. लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने बिग बॉस 16 मधून अधिक लोकप्रियता मिळवली. त्याच्या बोलण्याची स्टाइल अनेकांना भावली.बिग बॉस 16 च्या चमकणाऱ्या ट्रॉफीसोबतच एमसी स्टॅनला 31 लाख 80हजार ही रक्कम देण्यात आली. त्याबरोबरच त्याला एक नवी कोरी गाडीही भेट म्हणून दिली गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून एमसी स्टॅनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (MC Stan)
बिग बॉस 16 चं विजेतेपद जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘बस्ती का हस्ती’ अर्थात एमसी स्टॅनने बिग बॉसच्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर त्याच्या सोशल अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. सोशल अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये एमसी स्टॅनने लिहिलं, “आपण इतिहास रचला, मी नेहमीच खरं वागलो, नॅशनल टीव्हीवर रॅप हिपहॉप केलं. आईचं स्वप्न पूर्ण झालं आणि ट्रॉफी पी-टाऊनमध्ये (पुण्यामध्ये) आली. ज्याने ज्याने प्रेम दिलं त्या प्रत्येकाचा या ट्रॉफीवर हक्क आहे. शेवटपर्यंत एमसी स्टॅन.” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चाहत्यांचे आभार मानले. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे.
Web Title :- MC Stan | mc stan first post after winning bigg boss 16 trophy goes viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mumbai Crime News | मुंबईतील आयआयटीमध्ये 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
Bigg Boss 16 Grand Finale | पुण्याच्या एमसी स्टॅन बनला ‘बिग बॉस 16’ च्या पर्वाचा विजेता
Beed Crime News | दुर्देवी ! विजेचा धक्का लागल्याने 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू