‘व्हॉटस अॅप’ मध्ये झोल, ब्लॉक नंबरवरून ही येतायत मेसेजेस

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

सोशल नेटवर्किंग साईटस मध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘व्हॉटस अॅप’ मध्ये सध्या युजर्सना वेग वेगळया समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या अॅपवर युजर्सनी ब्लॉक केलेल्या संपर्क क्रमांकांवरून ही मॅसेज येत आहेत. ब्लॉक करणाऱ्या युजरचा व्हॉट्स अॅप स्टेटसही समोरच्या व्यक्तीला दिसत आहे. खरेतर ब्लॉक केलेल्या व्यक्तीचा संपर्क होऊ नये त्या व्यक्तीला माहिती,फोटो दिसू नयेत याकरिता ब्लॉकचा पर्याय आहे पण व्हॉटस अॅप मधील सध्याच्या तांत्रिक समस्येमुळे हा पर्याय नीट काम करीत नाही.

व्हॉट्सअॅपचे अँड्रॉइड व आयओएस व्हर्जन वापरणाऱ्या युजर्सनी या बगची तक्रार केली आहे. ब्लॉक करण्यात आलेले युजर्स मेसेज पाठवण्यासह स्टेटस व प्रोफाइलची माहिती पाहू शकत असल्याचंही समोर आलं आहे. कंपनीनं मात्र यावर अद्याप कसलीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी ब्लॉक नंबर पुन्हा अनब्लॉक करून पुन्हा ब्लॉक केल्यास या समस्येपासून सुटका करून घेता येऊ शकते. गेल्याच आठवड्यात व्हॉट्सअॅपचे काही नवीन फिचर्स आले होते. त्यात अॅडमिन कन्ट्रोल, ग्रुप कॅचअप, पार्टिसिपेंट सर्च आणि अॅडमिन परमिशन्सचा समावेश आहे. त्यानंतर या नव्या समस्येला युजर्स ना तोंड द्यावे लागत आहे.