MNS On Shivsena Eknath Shinde | ‘मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही’; वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरुन मनसेची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – MNS On Shivsena Eknath Shinde | राज्य सरकारने (Mahayuti Govt) वक्फ बोर्डाला (Waqf Board) १० कोटी देण्याच्या निर्णयावर राज्य सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. याबाबत अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale Video) एक व्हिडिओही समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. या निर्णयाला घेऊन मनसेनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.(MNS On Shivsena Eknath Shinde)

मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढी वाल्याला मदत करणे योग्य नाही, असे प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतं मिळाली नाहीत म्हणून राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजाचे लांगूनचालन केले जात असेल तर ते योग्य नाही.
भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात वक्फ बोर्डाची बळकटी करण्यासाठी हा निर्णय घेतला.
पण मग हे सरकार हिंदूंची बळकटी करणार का?, असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढी वाल्याला मदत करणे योग्य नाही,नरेंद्र मोदी यांना या लोकसभेला पुरेसं
पाठबळ जनतेने दिलं नाही. नाहीतर हा वक्फ बोर्डच रद्द करण्यात आला असता,असे महाजन यांनी म्हटले आहे.

पुढे महाजन म्हणाले, ” वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये देण्याचा जो शासन निर्णय घेतला आहे,
या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर निषेध करते. वक्फ बोर्ड ही घटनाबाह्य संस्था आहे.
वक्फ बोर्ड एकप्रकारे रद्द करायला पाहिजे. या देशाचे कायदे या बोर्डाला लागू होत नाहीत. वक्फ बोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालयात जाता येत नाही,
वक्फ बोर्डाकडे जावे लागते.” असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol – Amit Shah | पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मोहोळ दिल्ली दरबारी सक्रीय