Modern Human | नवीन स्टडी ! आधुनिक मनुष्य केवळ 1.5% होमो सँपियन्स, बाकी 98.5% आजही ’आदिमानव’

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –  शास्त्रज्ञांनी खुलासा केला आहे आजचा मनुष्य (Modern Human) 100 टक्के होमो सँपियन्स (Homo Sapiens) नाही. तो केवळ 1.5 टक्के ते 7 टक्केपर्यंतच होमो सँपियन्स आहे. उर्वरित बहुतांश भाग आजही ’आदिमानव’ आहे. या नवीन स्टडीत हा खुलासा मनुष्याच्या (Modern Human) जीनोमचा अभ्यास करून करण्यात आला आहे. शास्त्रज्ञ कोणत्या आधारावर हा दावा करत आहेत? यातून मनुष्याच्या इव्हॉल्यूशनची कथा बदलली जाईल का? ते जाणून घेवूयात… Modern Human | modern human genome is 15 unique rest is related to neanderthals

Modern human Neanderthal

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये बायोमॉलिक्यूलर इंजिनियरिंगचे असोसिएट प्रोफेसर आणि या स्टडीचे प्रमुख लेखक रिचर्ड ई. ग्रीन यांनी सांगितले की, स्टडीनुसार, 1.5 ते 7 टक्के जीनोमच होमो सँपियन्सचे आहेत. डीएनएचा उर्वरित 98.5 पासून 93.0 टक्केपर्यंत निएंडरथल मानवाशी (Neanderthals) संबंधित आहे.

Modern human Neanderthal

प्रो. रिचर्ड यांनी सांगितले की, सध्याच्या मानवाच्या डीएनएमध्ये अतिशय कमी जीनोममध्ये बदल झाला आहे. हा बदल खास आहे.
याच बदलामुळे आजच्या मनुष्याचा मेंदू आणि त्याची कार्य प्रणाली विकसित झाली आहे.
याच एका बदलामुळे आजचा मनुष्य आपल्या पूर्वजांच्या तुलनेत जास्त बुद्धिमान आहे, वेगळा आहे.

Modern human Neanderthal

मात्र, या स्टडीत ही गोष्ट स्पष्ट होत नाही की सध्याचा मनुष्य आणि निएंडरथल मनुष्यामध्ये कोणत्या प्रकारचा बायोलॉजिकल फरक आहे.
प्रो. रिचर्ड म्हणतात की, हा एक मोठा प्रश्न आहे, ज्यासाठी भविष्यात आपल्याला खुप काम करावे लागेल. परंतु सध्या आपल्याला हे समजले आहे की भविष्यात आपल्याला हे अंतर जाणून घेण्यासाठी कोणत्या दिशेने काम करावे लागेल.

Modern human Neanderthal

प्रो. रिचर्ड ई. ग्रीन यांचा हा स्टडी नुकताच सायन्स अ‍ॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.
या स्टडीमध्ये संशोधकांनी आधुनिक मानवाच्या डीएनएच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, निएंडरथल मानवाचा किती भाग आजच्या डीएनएमध्ये आहे.
किंवा आपल्याला तो जैविक वंशातून मिळाला आहे.

Modern human Neanderthal

प्रो. रिचर्ड म्हणतात की आपण ज्या प्राचीन काळाबाबत बोलतो त्यावेळी दोन मनुष्य प्रजातींनी आपसात क्रॉसब्रीड केले होते.
या दोन्ही प्रजाती होत्या विकसित होत असलेल्या नवीन होमो सँपियन्स आणि निएंडरथल.
यासाठी हे जाणून घेणे आवश्यक होते की, सध्या मनुष्यात निएंडरथल मानवाचा जेनेटिक व्हेरिएंट किती आहे. किंवा होमो सँपिंयन्सचा जीनोम जास्त प्रभावी आहे.

Modern human Neanderthal

यासाठी प्रोफेसर रिचर्ड यांच्या टीमने एक अल्गोरिदम बनवला. यास नाव दिले गेले – स्पीडी एन्सेस्ट्रल रिकॉम्बिनेशन ग्राफ एस्टीमेटर (speedy ancestral recombination graph estimator).
यामुळेच शास्त्रज्ञांच्या टीमला समजले की, अखेर मनुष्यात होमो सँपियन्स आणि निएंडरथल मानवाचे जेनेटिक व्हेरिएंट किती आहेत.
कारण आधुनिक मानव आणि निएंडरथलमध्ये जेनेटिक वेगळेपणा सुमारे 5000 वर्षापासून सुरु झाला होता.

Modern human Neanderthal

Modern human Neanderthal

Web Title : Modern Human | modern human genome is 15 unique rest is related to neanderthals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर