Monsoon League Cricket Tournament 2023 | तिसरी ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लब, जोशी स्पोर्ट्स संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Monsoon League Cricket Tournament 2023 | एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अपर्णा चंद्रशेखर ओक यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित तिसर्‍या ‘मान्सुन लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लब आणि जोशी स्पोर्ट्स संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. (Monsoon League Cricket Tournament 2023)

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जयदीप आवाड याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर जोशी स्पोर्ट्स संघाने जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबचा ३० धावांनी पराभव करून स्पर्धेत गुणांचे खाते उघडले. प्रथम फलंदाजी करताना जोशी स्पोर्ट्स संघाने १५२ धावांचे आव्हान उभे केले. जयदीप आवाड याने ४३ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. त्याला निलेश माळी याने ४४ धावा करून सुरेख साथ दिली. या आव्हानासमोर जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबचा डाव १२२ धावांवर मर्यादित राहीला. विजय म्हेत्रे (३२ धावा) आणि प्रशांत कुलकर्णी (२९ धावा) यांनी धावा काढत प्रतिकार केला. शाम यादव (२-१७) आणि स्वप्निल आचेगावे (२-२३) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे संघाचा विजय सोपा झाला.

शंतनु गांधी याच्या ६५ धावांच्या खेळीमुळे बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबने फोनिक्स् इलेव्हन संघाचा ७ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबने १५३ धावा धावफलकावर लावल्या. शंतनु गांधी याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकारासह ६५ धावा चोपल्या. अभिषेक खांबेटे (३२ धावा) आणि शशांक जोशी (३५ धावा) यांनीही फलंदाजीमध्ये योगदान दिले. या आव्हानासमोर फोनिक्स् इलेव्हनचा डाव १४७ धावांवर मयादित राहीला. तुषार माडीवाले याने ६३ धावा करत एकहाती झुंझ दिली. गिरीष ओक (३-२७) आणि कर्णधार आदित्य पाळंदे (१-२०) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर संघाने विजयश्री खेचून आणली. (Monsoon League Cricket Tournament 2023)

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
जोशी स्पोर्ट्सः १९ षटकात ८ गडी बाद १५२ धावा (जयदीप आवाड ५३ (४३, ७ चौकार, १ षटकार), निलेश माळी ४४,
विजय म्हेत्रे ४-१७, गणेश बाभुळगांवकर २-२१) वि.वि. जॅग्वॉर्स क्रिकेट क्लबः १९ षटकात ६ गडी बाद १२२ धावा
(विजय म्हेत्रे ३२, प्रशांत कुलकर्णी २९, अक्षय शिंदे २०, शाम यादव २-१७, स्वप्निल आचेगावे २-२३);
सामनावीरः जयदीप आवाड;

बिझनेस प्रोफेशनल्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद १५३ धावा (शंतनु गांधी ६५ (४३, ८ चौकार, १ षटकार),
अभिषेक खांबेटे ३२, शशांक जोशी ३५, अनिल मांडके ३-२७, तुषार माडीवाले २-३७)
वि.वि. फोनिक्स् इलेव्हनः २० षटकात ६ गडी बाद १४७ धावा (तुषार माडीवाले ६३ (५२, ७ चौकार), अंजल प्रभु ३२,
अनिल मांडके २६, गिरीष ओक ३-२७, आदित्य पाळंदे १-२०); सामनावीरः शंतनु गांधी.

Web Title :  Monsoon League Cricket Tournament 2023 | 3rd ‘Monsoon League’ Championship T20 Cricket Tournament; Winning performance of Business Professionals Cricket Club, Joshi Sports Teams !!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा