Corona Vaccine : कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘सब्यूनिट’ लस ठरेल ‘ब्रह्मास्त्र’, वैज्ञानिकांचा दावा

बंगळुरू : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत जर महत्त्वाचे योगदान आहे ते या रोगावरील लस. जगभरातील अनेक देशांकडून कोरोना विरुद्धची लस तयार केली जात आहे. मात्र कोरोना लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने ही सर्वात मोठी समस्या देशासमोर आहे. देशासमोरील ही समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिकांकडून प्रयत्न केले जात आहेत.

बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने (Indian Institute of Science) कोरोना लसीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. वैज्ञानिकांचा दावा आहे की यावेळी तयार होणारी लस कोरोनाच्या दुसऱ्या व्हेरिएंटचा खात्मा करण्याची क्षमता ठेवणारी आहे. IISC चे मॉलिकुलर बायोप्सिस युनिटच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी अशा अणुंचा शोध लावला आहे जे कोरोना व्हायरस सोबत लढण्यासाठी खूप फायदशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. जे अणू न्यूट्रलायजिंग अँन्टिबॉडीजचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात.

ही लस खूपच प्रभावी
वैज्ञानिकांचा असाही दावा आहे की, या कोरोना लसीचा परिणाम भारतात सध्या उपलब्ध असणाऱ्या लसीच्या तुलनेत अधिक आहे. मॉलिकुलर बायोप्सिसचे प्रो. राघवन वरदाराजन यांनी सांगितले की, हे अणू शररीरात मोठ्या प्रमाणात न्यूट्रलायजिंग अँन्टिबॉडीज तयार करतात. त्यामुळे ते धोकादायक व्हायरस सोबत लढण्याची क्षमता ठेवताता.

प्राण्यांवर यशस्वी चाचणी
उंदीर आणि सशांवर करण्यात आलेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ज्या प्राण्यांवर ही चचणी केली त्यात कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत 8 पटीने अँन्टिबॉडीज तयार झाल्याचं दिसून आलं. जर अँन्टिबॉडीज कमी झाल्या तरी रोगापासून वाचण्यासाठी ही लस प्रभावी आहे, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

अनुकूल वातावरणात टिकते
वैज्ञानिकांनी सांगितले की, ही लस भारताच्या अनुकूल वातावरणात टिकू शकते. ही गरम वॅक्सिन असल्याने रुम टेम्परेचरवर तिचा साठा ठेवला जाऊ शकतो. सध्या असलेल्या लसींचा साठा करण्यासाठी खूप कमी तापमानाची गरज भासते. त्यासाठी विशेष शीतगृह उभारावे लागतात. मात्र या लसीचे तसे नाही. ही लस वातावरणाशी जुळवून घेते. त्यामुळे इतर लसींप्रमाणे ती खराब होण्याची शक्यता नाही. एका रुमच्या टेम्परेचरवर लसीचा साठा ठेवला जाईल तेव्हा लसीकरण अभियानामध्ये याचा खूप मोठा फायदा होईल, असाही दावा करण्यात आला आहे.

ही सब्यूनिट लस
वैज्ञानिकांनी सांगितले की, त्यांनी तयार केलेली लस ही सब्यूनिट लस आहे. व्हायरसच्या भागावरील स्पाइक प्रोटीनची बाइडिंग क्षमता रिसेप्टर आणि पेशींमध्ये सर्वात जास्त आहे. याला रिसप्टर बाइंडिंग डोमेन म्हणता. स्पाइक प्रोटीन 1700 अमीनो ॲसिड लांब आहे. लसीमध्ये असणारे रिसेप्टर बाइडिंग डोमेन हा त्याचा एक लहानसा भाग असून तो 200 एमिनो ॲसिड लांब आहे.

सध्या सब्यूनिट लस उपलब्ध नाही
वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही लसीमध्ये कोणतीही सब्यूनिट लस नाही. IISC मागील एक वर्षापासून या लसीवर काम करत आहे. या लसीच्या वापरावरुन वैज्ञानिक प्रचंड आशावादी आहेत. मात्र, क्लिनिकल चाचणी आणि ह्युमन ट्रायलसाठी जवळपास नऊ ते दहा महिने एवढा कालावधी लागू शकतो. म्हणजे आणखी काही महिन्यात भारतात ही नवीन लस उपलब्ध होण्याची आशा आहे.