Multibagger Stock | ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल! वर्षभरात 1 लाखाचे झाले रू. 32 लाख, एक्सपर्ट देत आहेत खरेदीचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Multibagger Stock | शेअर बाजारात (Stock Market) शानदार तेजीमुळे गुंतवणुकदारांना चांगला फायदा होत आहे. अनेक छोटे-मोठे स्टॉक जबरदस्त (Small stock) परफॉर्म करत आहेत. आज आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger stock) बाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये वर्षभरात 542 टक्केची तेजी आली आहे. हा शेयर आहे – बालाजी अमाईन्स (Balaji Amines).

मागील वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला या शेअरची किंमत 618 रुपये होती आणि त्याची काल म्हणजे बुधवारी किंमत 3,977 रुपयांवर पोहचली आहे.
म्हणजे एक वर्षात या स्टॉकने 542 टक्केची वाढ केली आहे.
याच्या तुलनेत बेंचमार्क सेंसेक्स एक वर्षात जवळपास 45 टक्के वाढला आहे.
मात्र, आज या शेअरमध्ये 1.25% ची घसरण झाली आहे.

1 लाख रूपये झाले असते 32.19 लाख

या शेयरचा जर मागील एक वर्षातील परफॉर्मन्स पाहिला तर जर कुणी गुंतवणुकदाराने या स्टॉकमध्ये (Balaji Amines Share price) एक वर्षापूर्वी पाच लाख रुपये लावले असते तर आज ते वाढून 32.19 लाख रुपये झाले असते.
या वर्षाच्या सुरुवातीपासून या स्टॉकमध्ये 271 टक्केची तेजी आली आहे.
जून तिमाहीमध्ये कंपनीच्या चांगल्या रिझल्टनंतर तो 20 टक्के वाढून 3,977 रुपयांसह आपल्या 52 आठवड्याच्या हायवर पोहचला.

 

कंपनीचे मार्केट कॅप 11,000 कोटी रुपये

बालाजी अमाईन्सचे मार्केट कॅपिलायजेशन (Market Cap) 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. कंपनीचा शेअर 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या मूव्हिंग अ‍ॅव्हरेजपेक्षा जास्तने व्यवहार करत आहे.

एक्सपर्टनुसार, हा साप्ताहिक आणि मासिक इंडिकेटर्स खुप जास्त खरेदीचा संकेत देत आहे.
हा जास्त व्हॉल्यूमसह वाढत आहे. या स्टॉकमध्ये घसरण आल्यास कमी प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते. मात्र, यासाठी स्टॉपलॉस सुद्धा ठेवला पाहिजे.

 

Web Title : multibagger stock balaji amines give 542 pc return your 1 lakh would have become 32 lakh in a year

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा मिळणार?; पुणे पालिकेनं राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, राजेश टोपे, सचिव कुंटे यांच्यात बैठक

Coronavirus | अलर्ट ! मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका? जाणून घ्या कशाप्रकारे करावा त्यांचा व्हायरसपासून बचाव

Sangli Crime | ओढणीने गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना