Mumbai Covid Center Scam | मुंबई कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Covid Center Scam | मुंबईमधील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former Mayor Kishori Pednekar) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात (Agripada Police Station) पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर यांच्यासह महापालिकेचे दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही (BMC Senior Officers) गुन्ह्याची नोंद झाली आहे. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा (Mumbai Covid Center Scam) केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा (Mumbai Covid Center Scam) आरोप आहे. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचं अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचं (Enforcement Directorate (ED) म्हणणं आहे. यामध्ये किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे पेडणेकर यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉडी बॅग खरेदीत घोटाळा

मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2000 रुपयांऐवजी 6800 रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या.

ईडीचे राज्यभरात छापे

ईडीने 21 जून रोजी राज्यभरात अनेक ठिकाणी छापे मारले होते. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपयांची रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील केली होती. तसेच 15 कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. 21 जून रोजी ईडीने मारलेल्या छाप्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांच्यासह 10-15 जणांचा समावेश होता.

किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार – किरीट सोमय्या

किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी
म्हटले की, किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार. सोमय्या पुढे म्हणाले, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात
बॉडी बॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 1500 रुपयांची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग 6700 रुपयांनी घेतली.
मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त (Additional Commissioner) आणि वेदांत इनोटेक प्रा. लि.
(Vedant Innotech Pvt. Ltd.) च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही यासंबंधिची तक्रार मुंबई पोलिसांत (Mumbai Police) केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरु आहे.
यावर देखील कारवाई होणार आहे. आधी संजय राऊत (Sanjay Raut) यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते,
आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio | महाराष्ट्रामध्ये रिलायन्स जिओचा दबदबा कायम ! मे महिन्यात 4 लाख ग्राहकांची भर – ट्राय

Pune Crime News | पुणे : गुन्हे शाखेकडून कारच्या काचेवर चिठ्ठी लावून 10 लाखांची खंडणी मागणार्‍याला अटक