Mumbai Ice Cream Case | माणसाचं तुटलेलं बोट आढळलेलं ‘ते’ आईसक्रीम पुण्यातील हडपसरमध्ये तयार झाले, बॅच कोडमुळं ओळखला निर्माता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Ice Cream Case | मुंबईतील एका डॉक्टरला आईस्क्रीम खाताना त्यामध्ये माणसाचं कापलेले बोट आढळलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. या घटनेत पुणे कनेक्शन (Pune Connection) समोर आले आहे. हे आईस्क्रिम Yummo ब्रँडचे आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर डॉक्टर तरुणाने थेट मलाड पोलीस ठाण्यात (Malad Police Station) धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी यम्मो आईस्क्रिम कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात आयपीसी कलम 272 (उत्पादनामध्ये भेसळ करणे), कलम 273 (धोकादायक खाद्य आणि पेय विक्री) आणि कलम 336 (दुसऱ्यांचे आयुष्य धोक्यात टाकणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Mumbai Ice Cream Case)

13 जून रोजी मुंबईतील Yummo कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडले होते. आईस्क्रीमच्या रॅपवर लक्ष्मी आईस्क्रीम प्रा. लि., गाझियाबाद, यूपी असा मॅन्युफॅक्चरिंग पत्ता लिहिलेला होता. ही कंपनी गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटी औद्योगिक परिसरात आहे. एका दैनिकाने याबाबत कंपनीचे संचालक यादेश्वर पाल यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही यम्मू सह अनेक कंपन्यांसाठी आईस्क्रिम तयार करतो आणि देशभरात पुरवतो. पण आमच्या कंपनीचा मुंबतील घटनेशी संबंध नाही.

पाल यांनी पुढे सांगितले की, आईस्क्रीम कंपनीचे रॅपर सामान्य झाले आहे. या रॅपर्सवर सर्व उत्पादन प्रकल्पांची नावे एकत्रित लिहिली आहेत. मॅन्युफॅक्चरिंग प्लांटला बॅच कोड असतो. यावरुन हे आईस्क्रीम कोणत्या कंपनीत तयार केले हे ओळखता येते. मुंबईत ज्या आईस्क्रिममध्ये मानवी बोट आढळून आले त्याचा बॅच कोड त्याच्या रॅपरवर लिहिलेला आहे. कोडचे आईस्क्रीम पुण्यातील हडपसर येथील फॉर्च्युन प्लांटमध्ये तयार केले जाते. तर गाझियाबादच्या लक्ष्मी आईस्क्रीम कंपनीचा बॅच कोड डी ने सुरु होतो. फॉर्च्युन आणि लक्ष्मी या दोन्ही थर्ड पार्टी कंपन्या आहेत.

Yummo कंपनीकडून याप्रकरणी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही हे उत्पादन थर्ड पार्टीकडून घेतलं आहे. त्यांचे उत्पादन थांबवण्यात आले आहे. शिवाय मार्केटमध्ये गेलेले उत्पादन देखील परत बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी आम्ही तपास करत असून संबंधित प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar – RSS – BJP | संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”

Chhagan Bhujbal | लोकसभेत आम्ही दोनच जागा लढवल्या, मग 48 जागांवर परिणाम कसा? भुजबळांचा सवाल

Bhide Wada Smarak | भिडे वाडा येथे शाळा नाही स्मारक; भूमिपूजन जुलै मध्ये होणार असल्याची अजित पवारांची माहिती