Mundhwa Pune Crime News | पुणे: महिलेला मारहाण करुन लैंगिक संबंधांची मागणी, मुंढवा पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mundhwa Pune Crime News | महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच महिलेकडे लैंगिक संबंधांची (Demand Of Sexual Relations) मागणी करुन अश्लील वर्तन करुन विनयभंग केला (Molestation Case). याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी आरोपीवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.14) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुंढवा परिसरात घडला आहे.

याबाबत 51 वर्षीय पिडीत महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मनिष पोपट गायकवाड Manish Popat Gaikwad (वय-34 रा. गायकवाड वस्ती, वालचंदनगर, ता. इंदापूर) यांच्यावर आयपीसी 354, 354(अ), 323, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनिष फिर्यादी महिलेचा लांबचा नातेवाईक आहे. शुक्रवारी दुपारी महिला घरात एकटी असताना आरोपी त्याठिकाणी आला.(Mundhwa Pune Crime News)

मनिष याने महिलेच्या घरात येऊन तु माझा फोन का उचलत नाही. नंबर ब्लॉक का केला अशी विचारणा करुन सोबत चलण्यास सांगितले. मात्र, महिलेने त्याला नकार दिला असता त्याने अश्लील शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच महिलेसोबत असभ्य वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर महिलेकडे लैंगिक संबंधांची मागणी करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे करीत आहेत.

फोटो मॉर्फ करुन तरुणीची बदनामी

पुणे : तरुणीचा चेहऱ्याचा वापर करुन न्यूड व अश्लील व्हिडीओ, फोटो (Morphing Photos And Videos) व मेसेज तयार करुन ते इन्स्टाग्रामवर व्हायरल करुन तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.14) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास सदाशिव पेठेत (Sadashiv Peth Pune) उघडकीस आला. याप्रकरणी 26 वर्षीय मुलीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयपीसी 354, 500, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली