Murlidhar Mohol | वडगाव शेरीच्या रॅलीने ऊर्जा वाढवली – मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) भाजप महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथे बाईक रॅली काढून झंझावती प्रचार करण्यात आला. ही बाईक रॅली वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात काढण्यात आली. यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, इतर साऱ्या प्रचारापेक्षाही मला बाइक रॅलीवरच्या प्रचाराची रंगत अधिक जाणवते आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या अधिकाधिक मतदारांना भेटता येणं हा आनंद त्यात अधिक आहे. तो घेण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. ज्यामुळे मला नव्याने ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. वडगाव शेरीतही हाच अनुभव आला. कितीतरी लोक भेटीसाठी आसुसलेले पाहायला मिळाले.(Murlidhar Mohol)

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील या रॅलीचा प्रारंभ पर्णकुटी पायथ्याशी झाला. त्यानंतर येरवडा गावठाण, भाजी मंडई,
राम मंदिर, गुरुद्वारा मंदिर, दर्गावाडी, साईबाबा मंदिर परिसर, ज्ञानदीप चौक, नवी खडकी गाव, शांतीवीर चौक,
सुभाष नगर चौक, शिवसेना चौक, माणिकनगर या मार्गे ही रॅली गेली.
त्यानंतर मदनसिंग बावरी यांच्या दुकानाजवळ तिचा समारोप झाला.

या दरम्यान भेटलेल्या साऱ्यांनाच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघात
महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले.
त्याला सर्वांनी अतिशय उत्साही प्रतिसादात होकार दिला. अतिशय जल्लोषात पार पडलेल्या या रॅलीत असंख्य तरुण सहभागी झाले होते.

या रॅलीत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह महायुतीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust | ‘महाराष्ट्र दिन’ व ‘कामगार दिना’निमित्त महापालिकेच्या सफाई कामगारांचा सत्कार; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम