Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Murlidhar Mohol | महायुतीचे (Mahayuti) पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि.2) तरुणांनी बाईक रॅली काढून झंझावती प्रचार केला. ही बाईक रॅली कोथरूड विधानसभा मतदारसंघात (Kothrud Vidhan Sabha) काढण्यात आली. यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, बाईक रॅलीमध्ये सहभागी होताना महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवला. साऱ्या तरुणांसोबत जाताना नव्याने मिळालेली अखंड ऊर्जा भविष्यात कितीतरी काळ पुरेल इतकी असल्याचे मोहोळ यांनी म्हटले.(Murlidhar Mohol)

कोथरुड विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या या बाइक रॅलीत ठिकठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे हात उंचावून साद घालीत होते.
त्यांना मुरलीधर मोहोळ यांनी अभिवादन करुन आवर्जून मतदान करण्याची साद घातली.
भेलकेनगर पासून सुरू झालेली ही रॅली गुजरात कॉलनी, आझाद नगर, शास्त्रीनगर, सागर कॉलनी, हमराज, परमहंस नगर,
पेठकर साम्राज्य, सुतारदरा, जय भवानीनगर, रामबाग, कानिफनाथ मंडळ, साई मित्रमंडळ, मोरे विद्यालय चौक, हनुमाननगर,
एआरआय रोड, श्रीराम चौक, विश्वशांती चौक, किशोर विटेकर चौकमार्गे गेली व मेगा सिटीजवळ तिचा समारोप झाला.

या बाईक रॅलीमध्ये उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार संजय काकडे, दीपक मानकर, किशोर शिंदे,
वर्षा डहाळे, पुनीत जोशी, मिलिंद बालवडकर, डॉ. संदीप बुटाला, बाळासाहेब खंकाळ, माजी नगरसेवक दिलीप वेडे-पाटील,
किरण दगडे-पाटील, माजी नगरसेविका वासंती जाधव, हर्षली माथवड, अल्पना वर्पे, श्रद्धा प्रभुणे, छाया मारणे, प्रतिक देसरडा,
मयूर पानसरे, कांचन कुंबरे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”