Naal 2 | अवघ्या महाराष्ट्राला ‘नाळ 2’ मधल्या निरागस चिमीने लावलं वेड, जाणून घ्या कशी भेटली चिमी ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम | ‘नाळ (Naal)’ या चित्रपटाने अवघ्या महारष्ट्राला वेड लावले होते. तर लवकरच ‘नाळ 2 (Naal 2 )’ रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. झी स्टुडिओज (Zee Studios) आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ 2 (Naal 2 )’ कालच महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

‘नाळ 2’ या चित्रपटाला आणि त्यामधील गाण्यांना रसिक प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. चित्रपटामधील ‘डराव डराव’
हे गाणं प्रेक्षकांना चांगलच भावलं असून, या गाण्यातील बालकलाकाराने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतलं.
गाण्यामधील लहानग्या कलाकाराचा तोरा पाहून अनेक जण तिच्या प्रेमात पडलेत. तसेच तिची या पात्रासाठी निवड
कशी करण्यात आली हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रेक्षक आतुर झाले आहेत.

चित्रपटातील बालकलाकाराचे नाव त्रिशा ठोसर (Treesha Thosar) असून, नाळ 2 (Nagraj Manjule Upcomin Movie)
या चित्रपटामध्ये तिनं चिमी ही भूमिका साकारली आहे. चिमीची निवड करताना दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणाले, “
मी, नागराज मंजुळे आणि आमची टिम कलाकरांची निवड करत होतो. ज्यावेळी चिमी हे पात्र लिहिलं, त्याचवेळी तिचा
शोध सुरू झाला. आम्ही वयाची अट ठेवली नाही. आम्हाला शक्यतो लहान मुलगी हवी होती.”

“आम्हाला शक्यतो नवा कलाकार हवा होता. या दृष्टीने आमचे शोध कार्य सुरू झाले. आम्ही त्रिशाची ऑडीशन घेतली. आम्हाला सगळ्यांनाच ती फार आवडली. म्हणून आम्ही काही जण दोन दिवस तिच्या घरी दिवसभर जायचे ठरवले.
ती कशी राहते, बोलते, वावरते या सगळ्याचे आम्ही निरिक्षण केले आणि आम्हाला आमची चिमी (Naal – Chimee Character) सापडली, ” असं सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणाले.

दरम्यान, ‘नाळ 2 (Naal 2) या चित्रपटामध्ये श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे (Nagraj Manjule), देविका दफ्तरदार,
दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP – MNS | ‘…तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’, दिवाळी कार्यक्रमावरून भाजप-मनसेत जुंपली!

The Poona Merchants Chambers | खाद्यान्न एफएसएसएआय नविन व नुतणीकरण परवान्यांची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी; दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या पाठपुराव्याला यश